Shivsena : ठाकरे गटाला धनुष्यबाण गेल्याचा सर्वाधिक फटका बसणार विदर्भाच्या ग्रामीण भागात !

Nagpur : उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक चांगलेच संभ्रमात सापडले आहेत.
Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray.
Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray.Sarkarnama

Shivsena Uddhav Thackeray News : शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर शिवसैनिकांची ताकत अर्धी झाली आहे. ‘मी खचलो नाही, तुम्हीही खचू नका’, असा धीर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देत असले तरी, धनुष्यबाण गेल्याचा जो फटका बसायचा तो बसणारच आहे, असे शिवसैनिकांचे (ठाकरे) गट म्हणणे आहे.

आगामी महापालिका निवडणुकीची चिंता तर शिवसैनिकांना आहेच, पण त्यांच्या मते सर्वाधिक फटका बसणार आहे, तो ग्रामीण भागात. शिवसेनेचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक चांगलेच संभ्रमात सापडले आहेत. चिन्ह नसल्याचा फटका ग्रामीण भागातील निवडणुकीमध्ये बसणार असल्याचा धोका उद्धव यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. पण दुसरीकडे भाजपच्या कटकास्थानामुळे सहानुभूती मिळेल अशी आशाही त्यांना वाटत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने तशीही शिवसेना अर्धी झाली आहे. ४० आमदार आणि १३ खासदारांनी आधीच उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे आपसूकच शहर व गावांमधील कार्यकर्तेही विभागल्या गेले आहेत. आता शिवसेना आणि धनुष्यबाणही गेल्याने लढायचे कसे असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. विदर्भात याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भात एकही खासदार आणि आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही.

नागपूर महापालिकेचा विचार करता अवघे दोन नगरसेवक शिवसेनेत आहेत. माजी नगरसेवक किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे यांची मुख्य ताकद शिवसेना हीच होती. याच बळावर ते निवडून येत होते. महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर निवडून येतील असे आठ दहा उमेदवार शिवसेनकडे आहेत. मात्र शिंदे यांचे उमेदवारही रिंगणात राहणार असल्याने मतविभाजनाचा धोकाही त्यांना आहे. उद्धव ठाकरे यांच्या नागपूरच्या कार्यकारिणीत बरेच वाद आहेत.

Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे इन अॅक्शन मोड : 'लवकरच ठाण्यात येईन', म्हणाले...

दोन ते तीन गट आहेत. काहीजण शिंदे (Eknath Shinde) सेनेत दाखल झाले आहेत. जे सध्या पदाधिकारी आहेत त्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या शिवसैनिकांची (Shivsainik) निवडून येण्याची ऐपत आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस त्यांच्यासाठी जागा सोडण्याची शक्यता कमीच आहे. काही जागा सोडल्या तरी बंडखोरीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर लढताना कार्यकर्त्यांना यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com