उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या राणांना शिवसेनेचचं ओपन चॅलेंज; आधी...

Shivsena-BJP |Navneet Rana| दम असेल तर महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी, मी विरोधात लढेन, असं आव्हान नवनीत राणांनी दिलं होत.
Navneet Rana| Sunil Kharate
Navneet Rana| Sunil KharateSarkarnama

Shivsena Replied to Navneet Rana's Chellenge

मुंबई : लीलावती रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना घरी सोडण्यात आलं. विशेष म्हणजे रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिलं.'दम असेल तर महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी, मी विरोधात लढेन, असं राणा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राणा यांच्या या आव्हानाला शिवसेना कसं उत्तर देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागलं होत.

यावर अमरावती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी उत्तर देत राणांना ओपन चॅलेंज दिलं आहे. ''खोट्या जातप्रमाण पत्राच्या आधारे खासदारकी मिळवणाऱ्या नवनीत राणांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अमरावती मतदार संघातून कोणत्याही साध्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या विरोधात निवडणूक लवढून अपक्ष तरी निवडून येऊन दाखवावं, असं ओपन चॅलेंज सुनील खराटे यांनी दिलं आहे.

Navneet Rana| Sunil Kharate
राज्यमंत्री बच्चू कडू यांना अटक होणार ? आज सुनावणी

नवनीत राणांना अमरावतीच्या जनतेचा विश्वासघात करुन आता भाजपची साथ धरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलण्याची पात्रता नसताना त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आणि भाजपच्या सांगण्यावरून त्या बोलत आहे, असा आरोप सुनील खराटे यांनी यावेळी केला.

दरम्यान, राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) बारा दिवस तुरुंगात होते. चार दिवसांपूर्वी दोघांनाही मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीनावर सुटका झाल्यानंतर नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. तुरूंगात असताना त्यांच्या मानेचा त्रास बळावला होता. रुग्णालयात त्यांची तपासणी करून उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in