नवनीत राणांना व्हायचंय केंद्रात मंत्री! खासदार तुमानेंचा गौप्यस्फोट

मंत्रिपदासाठी दिल्लीच्या इशाऱ्यावर राणा दांपत्याची कलाबाजी
Ravi Rana| Navneet Rana
Ravi Rana| Navneet RanaSarkarnama

नागपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचे आहे. तसेच, जातीच्या बनावट प्रमाणपत्राचा निकाल आपल्या बाजूने लावायचा असल्याने राणा दांपत्याचा खटाटोप सुरू आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे (Shivsena) खासदार कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

खासदार तुमाने यांनी राणा दांपत्यावर आज अनेक गंभीर आरोप केले. या वेळी यावेळी शिवसेनेचे नेते सुरेश साखरे, मंगेश काशिकर, जयदीप पेंडके आणि दीपक कापसे उपस्थित होते. तुमाने म्हणाले की, नवनीत आणि रवी राणा यांनी अमरावतीमध्ये मोठा भूखंड हडपला आहे. माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत. याचबरोबर त्यांनी अमरावतीतील एका बिल्डरशी हातमिळवणी करीत बांधकामावरही ताबा मिळवला आहे. त्यावर टोलेजंग इमारत बांधण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, अमरावतीच्या एका व्यक्तीची संस्था हडप करून त्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न राणा दांपत्याने केला आहे.

Ravi Rana| Navneet Rana
गणेश नाईकांवरील अटकेची टांगती तलवार कायम; जामिनावर फैसला नाहीच

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी न्यायालयाने नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नवनीत राणा या नटी म्हणजेच कलाकार असून, त्यांची ही कलाबाजी दिल्लीतील इशाऱ्यावर सुरू आहे. हनुमान चालिसा पठण ही धार्मिक बाब आहे, त्यामुळे ती मंदिर अथवा स्वत:च्या घरी करावी. त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करीत फिरल्यामुळेच राणा दांपत्याला शिवसैनिकांनी जागा दाखवली, असाही टोला खासदार तुमाने यांनी लगावला.

Ravi Rana| Navneet Rana
राज ठाकरेंच्या सभेचं 'यूपी कनेक्शन'! अयोध्येतून येणार अडीच हजारांची कुमक

या वेळी बोलताना सुरेश साखरे म्हणाले की, राणा यांनी स्वत:ला दलित समजू नये. राखीव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी दलित-आदिवासींसाठी कोणतेही योगदान दिलेले नाही. डॉ. पल्लवी तडवी हिने उच्चवर्णीयांनी छळ केल्यानंतर आत्महत्या केली, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिनेश वाघमारे या दलिताचा गळा चिरून हत्या केली आणि औरंगाबादमध्ये एका दलित तरूणाला मंदिरात प्रवेश केल्यामुळे मारहाण झाली. या घटनांवर नवनीत राणा एकही शब्द बोलल्या नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:ला दलित म्हणवून घेण्याचा अधिकार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com