त्या मंत्र्याच्या मुलाला फाशी द्या, मोदीजी, तुम्हाला सलामी देईन : संतोष बांगर

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी, केंद्र सरकारवर टीका केली. संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना थेट आवाहन दिले आहे.

त्या मंत्र्याच्या मुलाला फाशी द्या, मोदीजी, तुम्हाला सलामी देईन : संतोष बांगर
Santosh Bangar, Narendra Modisarkarnama

हिंगोली : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बंद संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा याचा यांचा मुलगा आशिष याला उत्तरप्रदेश सरकारने अटक केली आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी लखीमपूर खिरी हिंसाचाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सकाळपासून या बंदला हिंगोलीमध्ये सुरुवात झाली, हिंगोली जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले होते, या बंद दरम्यान हिंगोली शहरातील गांधी चौक येथे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी, केंद्र सरकारवर टीका केली. संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना थेट आवाहन दिले आहे.

Santosh Bangar, Narendra Modi
बंद मोडण्याची भाषा करणारे मूर्ख ; राऊतांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून संतोष बांगर (Santosh Bangar) म्हणाले, ''लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी. या प्रकरणातील आरोपी भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला फाशी द्या, आपण दिल्लीत येऊन शिवसेनेचे आमदार म्हणून तुम्हाला सलामी देऊ''

आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बंद संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ''लोकांचा शेतकऱ्यांच्या संदर्भातला संताप समजून घेतला पाहिजे, जर कोणी म्हणत असेल की आमचा बंदला पाठिंबा नाही अशी राजकीय विधान कोणी करत असेल तर त्याने आपण स्वतःला या देशाचे खरंच नागरिक आहोत का आपण या शेतकऱ्यांचं देणे लागतोय का असा प्रश्न विचारला पाहिजे,'' असे राऊत म्हणाले.

''हा बंद मोडून काढला पाहिजे, असं जर कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. जर कोणी म्हणत असेल तर आम्ही रस्त्यावर येऊ तर त्यांनी उतरून दाखवा. गतिरोधक असता तर लखीमपूर येथे ज्या जीपने भाजपच्या मंत्री पुत्राने शेतकऱ्यांना चिरडलं ती जीप थांबली असती. या सरकारला गतिरोधक नाही म्हणून ती बेफाम आणि बेबंद पळत सुटली आहे. कुठे स्वतःच्या गाड्या खाली, तर कुठे महागाई डिझेल आणि पेट्रोलच्या भाव वाढीमध्ये गरीब सामान्य शेतकऱ्यांना हे सरकार चिरडत सुटले आहेत,'' असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Related Stories

No stories found.