शिवराजसिंह चौहान म्हणाले, नितीन गडकरी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात...

आता प्रत्येक ठिकाणी स्क्रॅपींग युनिट सुरू होतील. त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल आणि प्रदुषणही कमी होईल, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

नागपूर : पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या केंद्र सरकारच्या गाड्या भंगारात निघणार असल्याची माहिती अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज दिली. अमरावती (Amravati) रोडवरील दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर आयोजित अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कालच मी एका फाईलवर स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) मला यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. हा निर्णय असा आहे की, १५ वर्षे पूर्ण झालेल्या केंद्र सरकारच्या (Central Government) वा केंद्र सरकारच्या उपक्रमातील सर्व गाड्या यापुढे भंगारात काढाव्या लागतील. केंद्राच्या या धोरणाची अंमलबजावणी सर्व राज्य सरकारांनी करावी, म्हणून हे धोरण सर्व राज्यांना पाठवले आहे. पंधरा वर्ष पूर्ण केलेले ट्रक, बसगाड्या, चारचाकी, दुचाकी राज्यांनीही भंगारात काढाव्या, अशी अपेक्षा आहे. आता प्रत्येक ठिकाणी स्क्रॅपींग युनिट सुरू होतील. त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल आणि प्रदुषणही कमी होईल, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

यापुढे फ्लेक्स इंजिनवर चालणारी वा इलेक्ट्रिक इंजिनवर चालणाऱ्या गाड्या खरेदी करा. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी शक्य होणार आहेत. पऱ्हाटीपासून तयार केलेल्या सीएनजीवर शेतकऱ्यांची वाहने चालतील. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. इथेनॉलचे पंप टाकायचे आहे. ते टाकले की शेतकऱ्यांच्या मुलाची मोटरसायकल, गाड्या बायोइथेनॉलवर चालतील. विदर्भ पेट्रोल, डिझेल मुक्त करायचा आहे. आजकाल गावात विजेची मोठी समस्या आहे. कारण गावांत खूप लोडशेडींग होते. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी सोलरपंप घ्यावे, असे गडकरी यांनी सांगितले. सरकारी योजनेतून सोलरपंप मिळतात. यावर मोठी सवलत आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच वादग्रस्त विधान; गडकरी स्पष्टच बोलले...

यावेळी बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी अॅग्रो व्हिजनमुळे शेतकऱ्यांचे जीवन बदलल्याचे सांगितले. नितीन गडकरी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. स्वत: पाहिल्याशिवाय लोक विश्वास ठेवत नाही. गडकरींनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात लोक अशा गोष्टी स्वत: पाहतात. नितीन गडकरींनी अॅग्रो व्हिजन विदर्भापुरते मर्यादित न ठेवता मध्यप्रदेशातही आयोजित करावे. तिथे सरकार मदत करेल. शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याची ताकद या कृषी प्रदर्शनात आहे, असे चौहान म्हणाले. इथेनॉलवर मध्यप्रदेश सरकार गांभीर्याने काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. रेणुका देशकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर रमेश मानकर यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com