शिवाजी महाराज पुतळा प्रकरण तापलंः युवक कॉंग्रेसने जाळले राणा दामप्त्याचे पुतळे…

आज दुपारी राणांच्या (Navnit and Ravi Rana) समर्थकांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा पुतळा बडनेरा येथे जाळला. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी केला.
शिवाजी महाराज पुतळा प्रकरण तापलंः युवक कॉंग्रेसने जाळले राणा दामप्त्याचे पुतळे…
Navnit and Ravi Rana statue Burned at Tiosa.Sarkarnama

नागपूर : अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. आज दुपारी खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या समर्थकांनी महिला व बालविकास मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा पुतळा जाळला. त्याला प्रत्युत्तर म्हणून युवक कॉंग्रेसने (Congress) तिवसा येथे पेट्रोल पंप चौकात राणा दाम्पत्याचे पुतळे जाळले.

आमदार राणा यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उड्डाणपुलावर स्थापन केला होता. त्यासाठी त्यांनी कुठूनही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे महानगरपालिकेने तो पुतळा हटविला. त्यानंतर आमदार व खासदार राणा दोघेही आक्रमक झाले होते. परवा त्यांच्या घरासमोर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आमदारांना त्यावेळी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा तापतच गेले. आज दुपारी राणांच्या समर्थकांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पुतळा बडनेरा येथे जाळला. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.

राणांना जोरदार प्रत्युत्तर म्हणून युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज ५.४० वाजता अमरावती-नागपूर महामार्गावरील तिवसा या गावात पेट्रोल पंप चौकात राणा दाम्पत्याचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. दरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आमदार व खासदार राणा यांना आपली मनमानी करू देणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल. यापुढे त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा अपमान करण्याचा प्रयत्नही करू नये, अन्यथा त्यांना चांगला धडा शिकविण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

Navnit and Ravi Rana statue Burned at Tiosa.
राणा दाम्पत्य नजरकैदेत; अमरावतीमधील शिवरायांचा पुतळा मध्यरात्री हटवला

जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी युवकांची माथी भडकवली आणि त्यांच्या पगारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पुतळा जाळला. पालकमंत्री विकासाची कामे करतात. म्हणून त्या सातत्याने निवडून येत आहे. त्यांच्याकडे विकासाच्या नावावर सांगायला काहीच नाही. त्यामुळे असे पुतळ्याचे राजकारण करून आपली पोळी शेकण्याचे काम ते करीत आहे. पालकमंत्री हे संविधानिक पद आहे. त्या पदाचा आणि यशोमती ठाकूर यांचा अपमान युवक कॉंग्रेस कदापि सहन करून घेणार नाही. पालकाच्या पदाची गरीमा जपण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती पार पाडू.

- वैभव वानखडे, माजी नगराध्यक्ष, तिवसा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.