NCP : शिवनेरीवर पाय ठेवू देणार नाही ; राष्ट्रवादीच्या आमदाराचा शिंदे-फडणवीसांना सज्जड दम

Atul Benke : अधिवेशनात भाजपच्या नेत्यांनी तसं काहीही केलं नाही
Atul Benke latest neews
Atul Benke latest neewssarkarnama

Atul Benke : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे नेते, केंद्रीयमंत्री सुधांशु त्रिवेदी, आमदार मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, खासदार रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. पण हिवाळी अधिवेशनात त्यांची फारशी दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नसल्याचे दिसते.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात याबाबत फारशी चर्चा झाली नाही. विरोधकांनी मात्र विधीमंडळाच्या पायऱ्यावर राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांना परत पाठविण्याची मागणी केली.

Atul Benke latest neews
School bus accident : शालेय मुलींची बस ओढ्यात कोसळली ; बारामती जवळ तीन मुली गंभीर जखमी

शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्यांनी अद्याप माफी मागितली नसल्याने हिवाळी अधिवेशनात जुन्नर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके संतापले. त्यांनी सभागृहातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत सज्जड दम दिला.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी दरवर्षींप्रमाणे यंदाही शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री उपस्थित असतात. या पार्श्वभूमीवर आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. या सोहळ्यास त्यांच्या येण्यावरच बेनके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in