
नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करीत सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारसोबत १६४ आमदार आहेत. शिवसेनेसाठी ही मोठी नामुष्की आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.(Shivsena Latest Marathi News)
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आणि विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी १६३ मते आम्हाला मिळाली, त्याच दिवशी शिवसेनेने (Shivsena) न्यायालयातील त्यांनी टाकलेल्या सर्व केसेस मागे घ्यायला पाहिजे होत्या. कारण सभागृहात १६४ डोके मोजले गेले, एक नव्हे तर दोन दोन वेळा मोजले गेले. सरकारला मोठे बहुमत मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) हाच विचार केला असावा की, १६४ आमदार सरकारसोबत आहेत. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला (Maharashtra Government) दिलासा दिला असावा, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
जनादेशाचा आदर करावा..
गेल्या काही दिवसांत ज्या घडामोडी घडल्या, त्यावरून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना बोध घेतला पाहिजे. भाजपने स्थापन केलेल्या सरकारमध्ये १६४ आमदार सहभागी आहेत. त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सरकारचा हा विजय म्हणजे राज्यातील जनतेचा विजय आहे. जनतेने ज्यांना कौल दिला होता, त्या लोकांचे सरकार आता आले आहे. शिवसेनेने २०१९ मध्ये जनादेश धुडकावून अनैसर्गिक युती केली. त्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे आता तरी त्यांनी जनादेशाचा आदर करावा आणि केवळ चिडून जाऊन कृती करण्यापेक्षा न्यायालयातील सर्व केसेस मागे घ्याव्या, असे आमदार बावनकुळे म्हणाले.
येवढा सगळा आटापिटा करूनही शिवसेनेच्या हाती काहीही लागणार नाही. आता आहे ते आमदार आणि खासदार सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. सध्या ते जे काही करत आहे, हा केवळ अट्टहास आहे. त्यामुळे राजकारणाची हवा ओळखावी, परिस्थिती समजावी आणि निर्णय घ्यावे. राजकारणात संख्याबळाला मोठे महत्व आहे आणि संख्याबळाचे आकडे आज त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे अट्टहास करण्यात काही अर्थ नाही. योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ असल्याचेही आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.