Shivsena : शिवसेनेचा उमेदवार ठरला, भाजप उद्या घेणार निर्णय, काँग्रेसचे काही ठरेना !

Teacher Graduate Constituency Election
Teacher Graduate Constituency Election

Nagpur Teacher Graduate Constituency Election : नागपूर शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या शिक्षक सेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. गंगाधरराव नाकाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी कालच जाहीर केले. भाजपकडून उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण कॉंग्रेसचे अद्याप काहीही ठरलेले नाही.

भाजपतर्फे (BJp) माजी आमदार नागोराव गाणार यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. शिक्षक परिषदेची बैठक उद्या १ जानेवारीला होणार आहे. या बैठकीनंतर भाजपचा उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट होणार आहे. भाजपने प्रथमच शिक्षक आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत (Election) पक्षाचा उमेदवार उतरवण्याचे ठरवले आहे. मराठवाडा येथील उमेदवार घोषित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तसे जाहीर केले आहे. नागपूरचा (Nagpur) निर्णय मात्र राखून ठेवला आहे. आत्तापासून फटाके लागू नये याकरिता काळजी घेतली जात असल्याचे समजते.

राजेंद्र झाडे यांनी आपले इरादे आधीच जाहीर केले आहे. ते काँग्रेसच्या समर्थनासाठी प्रयत्न करीत आहे. पदवीधर निवडणुकीत आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दीपक खोब्रागडे, राजेंद्र भारती, रवींद्र डोंगरदेव, रणजीत पाटील, सुधाकर अडबले यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम आणि मतदारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. कल्पना पांडे, अनिल शिवणकर तसेच राजेंद्र कन्नाटे भाजपकडे आपल्या नावाचा पाठपुरावा करीत आहे.

Teacher Graduate Constituency Election
Kunal Patil News; धुळ्याच्या प्रश्नांवर नागपूर अधिवेशनात घडवली चर्चा

नागोराव गाणार यांना दोनदा संधी दिली. बारा वर्षे ते आमदार होते. आता दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी इच्छुकांची आहे. मात्र नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्याच उमेदवाराचे नाव निश्चित होणार आहे. राज्य शिक्षक परिषदेने गाणार यांच्या नावाचा उमेदवारीसाठी ठराव केला आहे. तो भाजपकडे पाठवण्यात आला आहे. निवडणूक जाहीर झाली असल्याने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. ३० जानेवारीला मतदान तर दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in