शिवसेनेतील बंड : १०.३० वाजता सुरू होणार सुनावणी, धक्का कुणाला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांसाठीही आजचा दिवस महत्वाचा आहे.
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political crisis News, Shivsena Political Crisis
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political crisis News, Shivsena Political CrisisSarkarnama

नागपूर : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड आज निर्णायक वळणार आल्याचे दिसत आहे. शिंदेंची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू होणार असून यानंतर धक्का कुणाला बसणार, याची उत्कंठा महाराष्ट्रातच (Maharashtra) नव्हे तर देशभरात शिगेला पोहोचली आहे. (Shivsena Political Crisis news updates)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांसाठीही आजचा दिवस महत्वाचा आहे. पक्षाच्या बैठकीला न येणे, ही पक्षविरोधी कारवाई नाही. अल्पसंख्येत आलेल्या सरकारने प्रतोद नेमणे चुकीचे आहे, अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवडही चुकीची आहे आणि १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून होणार आहे. १०.३० वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर तासाभरात निकाल येणे अपेक्षित आहे.

सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या असून एक एकनाथ शिंदेंनी तर दुसरी बंडखोर १६ आमदारांनी दाखल केली आहे. शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंगवी, शिंदे गटाचे वकील हरिष साळवे, तर कपिल सिब्बल उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची बाजू मांडणार आहेत. आज एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्यास उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी तो मोठा धक्का असणार आहे. असे झाल्यास शिंदे गट येत्या एक दोन दिवसांत फ्लोअर टेस्ट देण्याची शक्यता आहे. राज्यपाल बंडखोर गटाला आमंत्रित करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

आज न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील गोष्टी सुलभ होणार आहेत. यानंतरच सत्तास्थापनेचे नियोजन होणार आहे. बंडखोरांच्या गटात आनंदाला उधाण आले आहे. त्यांच्याकडून संभाव्य मंत्र्यांची नावे निश्‍चित केली गेल्याचीही माहिती पुढे येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असलेल्या महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना मंत्रिपदे मिळणार आहेत. याशिवाय माजी मंत्री यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे आमदार संजय राठोड यांचे पुनर्वसन केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान फुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, बच्चू कडू यांची नावे मंत्रिपदाच्या यादीत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political crisis News, Shivsena Political Crisis
माझा लढा सर्व शिवसैनिकांच्या हितासाठी समर्पित : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा ट्विट करीत उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी दाऊद याच्यासोबत संबंध असलेल्या व्यक्तीला बाळासाहेबांची शिवसेना कशा काय समर्थन देऊ शकते. याच्याच विरोधात आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाळासाहेबांची शिवसेना वाटवण्यासाठी आम्ही हे बंड केले आहे. या लढाईत आम्हाला मरण आले तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही स्वतःला भाग्यवान समजू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. ही चर्चा विलीनीकरणासाठी असल्याचेही सूत्र सांगतात. सध्या एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे ३९ आमदार तर एकूण आमदार ५१ असल्याची माहिती गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. या संख्याबळाच्या भरवशावर राज्यात सत्तांतर होईल, असे सांगितले जात आहे. नेमके काय होणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com