शिवसेनेच्या खासदार, आमदाराची मुंबईवारी सफल, जिल्हाप्रमुख कायम !

फेरबदलास विरोध दर्शवणारे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल यांनी केलेली मुंबई वारी फलदायी ठरल्याची चर्चा शिवसेनेच्या (Shivsena) वर्तुळात आहे.
शिवसेनेच्या खासदार, आमदाराची मुंबईवारी सफल, जिल्हाप्रमुख कायम !
Prakash Jadhav and Ashish Jaiswal ShivsenaSarkarnama

नागपूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत त्यांना बदलवून माजी खासदार व माजी जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांना जिल्हाप्रमुखपदी बसवण्याच्या हालचालींना वेग आला होता. पण जाधव पुन्हा जिल्हाप्रमुखपदी येऊ नये, यासाठी एक गट सक्रिय झाला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता जिल्हाप्रमुखाऐवजी संपर्कप्रमुखच बदलवण्यात आला आहे.

नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख (Shivsena District Chief) बदलण्याच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने (Shivsena) संपर्क प्रमुखच बदलल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे फेरबदलास विरोध दर्शवणारे रामटेकचे (Ramtek) खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) आणि आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी केलेली मुंबई वारी फलदायी ठरल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे. नागपूर ग्रामीणची जबाबदारी पुन्हा सुधीर सूर्यवंशी यांना देण्यात आली होती. येथील संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांना यवतमाळला पाठवण्यात आले आहे. नागपूर ग्रामीणचे संपर्क प्रमुख सूर्यवंशी यांना बदलण्यात आले होते. त्यांच्या जागी मधुकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या फेरबदलास अद्याप महिना पूर्ण व्हायचा आहे. देशमुख यांनी संपर्क प्रमुख होताच ग्रामीणचे जिल्हा प्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. काही नेत्यांसोबत चर्चासुद्धा केली होती. त्यातून माजी खासदार आणि जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे काही पदाधिकारी कामाला लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हाही घोषित होण्याची शक्यता असल्याने सध्यास संघटनेत फेरबदल करण्यात येऊ नये अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली होती. बुधवारी काही स्थानिक पदाधिकारी यासाठी मुंबईत गेले होते. त्यानंतर अवघ्या चोवीस तासात सूर्यवंशी यांना पुन्हा नागपूर ग्रामीणचे संपर्क प्रमुखपद बहाल करण्यात आले. पक्षातर्फे तसा अधिकृत आदेशही काढण्यात आला.

Prakash Jadhav and Ashish Jaiswal Shivsena
मनसैनिकांच्या शिवसेना प्रवेशावर राजू पाटलांचा गंभीर आरोप; खोट्या केसेस...

खासदार आणि आमदाराची मुंबईवारी यशस्वी झाल्याची दावा त्यांच्या समर्थकांमार्फत केला जात आहे. संपर्क प्रमुखांच्या फेरबदलाने ग्रामीणचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार आणि राजू हरणे यांनाही जीवदान मिळाले आहे. विनायक राऊत नागपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असताना देशमुख रामटेक विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख होते. राऊत आणि प्रकाश जाधव यांचे चांगले संबंध होते. देशमुख यांच्या माध्यमातून राऊत यांनी प्रकाश जाधव यांना पुन्हा जिल्हा प्रमुख करून शिवसेनेत सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या असे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.