श्वेता महालेंचा नवरा मंत्र्यांचे पाय चाटतो; गायकवाडांची खरमरीत टीका

मंदिरावरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
श्वेता महालेंचा नवरा मंत्र्यांचे पाय चाटतो; गायकवाडांची खरमरीत टीका
Shweta Mahale, Sanjay Gaikwadsarkarnama

बुलडाणा : बुलडाणा शहरातील एक हनुमान मंदिर गेल्या आठवड्यात जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. यावरुन जिल्ह्यात मोठे राजकारण रंगले आहे. हे मंदिर पाडल्यामुळे भाजपच्या (Bjp) चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत हे गझनीचे सरकार असल्याचे म्हटले होते. या टीकेवरुन शिवसेनेचे (shivsena) बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी श्वेता महाले यांचा चांगलाच समाचार घेतला.

गायकवाड बुलडाण्यामध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ते मंदिर मी बांधले होते. आता त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ते पाडले आहे. विकास कामात आगामी काळात मी विदर्भात पहिला असेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्या चिखलीच्या आमदारांनी काल टीका केली, की हे सरकार अफजल खानाचे आहे, गझनीचे आहे. इकडे सरकारवर टीका करायची व तिकडे तिचा नवरा मंत्र्यांचे पाय चाटतो निधीसाठी...? मग या सरकारचे पैसे तुम्हाला चालतात का...? अशा शब्दांत गायकवाड यांनी महाले यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता जिल्ह्यात या मंदिरावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Shweta Mahale, Sanjay Gaikwad
महावितरणच्या दाव्यावर आमदार बावनकुळेंनी लावले प्रश्‍नचिन्ह

श्वेता महाले काय म्हणाल्या होत्या?

मंदीरा संदर्भात महाले श्वेता महाले यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की ''मोहंमद गझनी व अफजलखानाने हिंदूंची पवित्र मंदिरे तोडल्याचा दुर्देवी इतिहास आहे. ज्यांचे पिताजी हिंदुहृदयसम्राट म्हणून सर्वांच्याच आदरस्थानी राहिले त्या मा. बाळासाहेबांचे मुख्यमंत्री सुपुत्र महाराष्टातले गझनी बनले आहेत. बुलडाण्यातील हनुमान मंदिर तोडणाऱ्या अफजली सरकारचा निषेध! जिवाजी महाले यांच्या स्मारकाला भाजपचा पाठिंबाच आहे. मात्र, हनुमानाच्या मंदिरावर बुलडोझर चालविण्याची कृती निंदनीय!''

Shweta Mahale, Sanjay Gaikwad
दादा म्हणाले; रजनीश सेठ स्पष्ट सांगतो, राजकीय दबावात काम करू नका...

''अगोदर हनुमान चालीसा ला विरोध आता मंदिर तोडताय. कुठे गेले तुमचे हिंदुत्व? हिंदूंची मंदिरे तोडण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री हवे होते का? हेच वचन दिले होते का मा. बाळासाहेबांना? हनुमान मंदिर उध्वस्त करणाऱ्या महाभकास सरकारपासून महाराष्ट्राच्या जनतेची लवकरच सुटका होईल. भूत पिशाच निकट नही आवे महावीर जब नाम सुनाये. महाराष्टाला वेठीस धरणारे महाविकास आघाडी सरकारचे भूत लवकरच महाराष्टारच्या मानगुटीवरून उतरेल,'' असे महाले म्हणाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.