शिवसेनेच्या बैठकीला १५०, तर शिंदेसेनेच्या बैठकीला २५० शिवसैनिक; राडा होणार?

रामटेकचे (Ramtek) खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर काल झालेल्या पहिल्याच बैठकीत सुमारे अडीचशे शिवसैनिक उपस्थित होते.
Eknath Shinde, Krupal Tumane and Uddhav Thackeray.
Eknath Shinde, Krupal Tumane and Uddhav Thackeray.Sarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १२ खासदारांचा गट मूळ शिवसेनेपासून (Shivsena) वेगळा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला. या घडामोडी झाल्यानंतर खासदार कृपाल तुमाने काल पहिल्यांदा नागपुरात आले. येथे विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या स्वागतादरम्यान शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे दिसतेय.

रामटेकचे (Ramtek) खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर काल झालेल्या झालेल्या पहिल्याच बैठकीत सुमारे अडीचशे शिवसैनिक उपस्थित होते. त्यानंतर सोमलवाडा येथे तुमाने यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम धोटे, संघटक नंदकिशोर दंडारे, रामटेकचे (Ramtek) बिकेंद्र महाजन, कुहीचे सचिन पुंडके, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे, महेंद्र भुरे, सुत्तम मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दोनच दिवसांपूर्वी रविभवन येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत तुमाने यांना गद्दार ठरवण्यात आले होते. त्यांचा सुबोध मोहिते करू असे असाही इशारा देण्यात आला होता. त्या बैठकीला शे-दीडशे शिवसैनिक उपस्थित होते. तुमाने आणि जयस्वाल यांच्यासोबत कोणी गेले नाही, असाही दावा केला जात होता. मात्र, तुमाने यांच्या बैठकीला दोनशेच्यावर शिवसैनिक उपस्थित असल्याने शिवसैनिकांमधील अस्वस्थता वाढली आहे. तुमाने यांच्या समर्थकांनी बैठकीला आम्ही मोजकेच आलो. अनेकांना मुद्दामच निरोप दिले नव्हते. जेवढे बैठकीला आले त्यापेक्षा जास्त बाहेर आहेत, असा दावा त्यांनी केला. एकूणच शिवसेनेत झालेल्या दोन गटांमुळे भविष्यात शिवसैनिकांमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Eknath Shinde, Krupal Tumane and Uddhav Thackeray.
धनुष्यबाण मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना गाठायचाय 188 चा आकडा!

शासकीय समित्या, मंडळांवर करणार नियुक्त्या..

शिंदेसेनेच्या समर्थकांना बळ देण्यासाठी त्यांनी शासकीय समित्या, मंडळावर नियुक्ती केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांना थोपण्यासाठी शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in