शिवसेना नेत्याने सायंकाळी पत्रकाराला दिली धमकी, अन् त्याच रात्री केला हल्ला…

आलेल्या मान्यवरांचा नामोल्लेख करताना झंवर यांना आयोजकांनी दिलेल्या यादीनुसार नावे घेतली. त्यात शिवसेना (Shiv Sena) नेते शरद पाटील यांचे नाव नसल्याने ते घेतले नाही.
शिवसेना नेत्याने सायंकाळी पत्रकाराला दिली धमकी, अन् त्याच रात्री केला हल्ला…
Shiv Sena leader attacked on journalist.Sarkarnama

बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा येथे एका लग्नात स्वागत समारंभाचे संचालन करणाऱ्या पत्रकाराला शिवसेना नेत्याने ‘पाहून घेईन’ची धमकी दिली आणि त्याच रात्री त्याच्या घरावर जीवघेणा हल्ला चढवला, असा आरोप पत्रकाराने केला आहे. या हल्ल्यात पत्रकारासह त्याच्या कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. शिवसेना नेत्याच्या दादागिरीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मंगळवारी बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील मोताळा येथील माळी कुटुंबात लग्न होते. लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागत समारंभाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्थानिक पत्रकार गणेश झंवर यांच्याकडे दिली होती. आलेल्या मान्यवरांचा नामोल्लेख करताना झंवर यांना आयोजकांनी दिलेल्या यादीनुसार नावे घेतली. त्यात शिवसेना (Shiv Sena) नेते शरद पाटील यांचे नाव नसल्याने ते घेतले नाही. शरद पाटील यांना या गोष्टीचा इतका राग आला की, त्यांनी लग्नमंडपातच गणेश झंवर यांना “पाहून घेईन”ची धमकी दिली. त्यानंतर लग्न सोहळा आटोपून गणेश झंवर हे घरी परतले.

गणेश झंवर घरी पोहोचल्यावर शरद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या घरावर जीवघेणा हल्ला केला, असा आरोप झंवर यांनी केला आहे. लोखंडी रॉड, लाकडी राप्टर, लाठ्याकाठ्या घेऊन पाटील पिता-पुत्राने झंवर यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार गणेश झंवर आणि त्यांच्या पत्नी अनिता झंवर यांच्यासह झंवर परिवारातील धनराज, वैभव व विवेक झंवर हे जखमी झाले. बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून पोलिसांनी १३ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Shiv Sena leader attacked on journalist.
शिवसेना नेत्याशी पंगा महागात! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपूर्व बदली

या घटनेची सत्यता जाणून पोलिसांनी ३०७ कलमान्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जखमी गणेश झंवर यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. जर पोलिसांनी ही कारवाई केली नाही तर रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा गणेश झंवर यांनी दिला आहे. झंवर कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात शिवसेना नेत्याच्या दादागिरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. या बाबतीत आरोपी शिवसेना नेते शरद पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.