संजय राठोडांचे मंत्रिमंडळात कमबॅक निश्चित! एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितले...

Sanjay Raothod | Eknath Shinde : पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूनंतर राठोडांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Sanjay Rathod News in Marathi, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis
Sanjay Rathod News in Marathi, Eknath Shinde News, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई : राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. आषाढी एकादशीनंतर आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. याच विस्तारातच त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. याबाबत आज दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका वाक्यात संकेत दिले.

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये राठोड यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली होती. त्यात त्यांना वनखात्याची जबाबदारी मिळाली होती. मात्र गतवर्षी ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या तब्बल १२ ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

परंतु आता आज दिल्ली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे, असे म्हणतं त्यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकचे संकेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या भेटीत त्यांनी कालपासून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली.

या दरम्यान दोघांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेवून विविध प्रश्नांची माहिती दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर देखील भाष्य केले. याचवेळी संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com