राणा दाम्पत्याच्या हाती राष्ट्रीय नेतृत्व देण्याचे काम शिवसेना करतेय !

राज्यात अशा प्रकारे सरकारच कायदा आणि सुव्यवस्था खराब करणार असेल, तर हा विषय गांभीर्याने घ्यायची गरज आहे, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : शिवसेनेला आव्‍हान देऊन राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी काल गनिमी काव्याने पोहोचले. त्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. कालपासून माध्यमांवर केवळ हाच विषय झळकत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) यांनी आज या विषयावर प्रतिक्रिया दिली.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा येथे पुष्कर मेळाव्यासाठी गेले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा विषय विनाकारण वाढवून शिवसेना राणा दाम्पत्याच्या हाती राष्ट्रीय नेतृत्व देण्याचे काम तर करत नाहीये ना, अशी शंका यायला लागली आहे. यामागे भाजपचे पाठबळ असल्याचाही आरोप आता केला जात आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, कुणाच्याही घरावर आंदोलन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे समर्थन नसते. आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) आंदोलन करीत नाहीये, तर हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.

हनुमान चालिसा कुणी म्हणत असेल, तर कुणालाही त्याचा राग येण्याचे काही कारण नाही. सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यावरून असे वाटते की, शिवसेनेला राणा दाम्पत्याला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून द्यायची आहे. राणा दाम्पत्य आले असते, एका कोपऱ्यात उभे राहून हनुमान चालिसा म्हटली असती आणि चालले गेले असते. दुसऱ्या कोणत्याही प्रकारे हा विषय हाताळता आला असता. पण शिवसेनेने तसे न करता. मातोश्रीवर शिवसैनिकांना जमा करून असे काही वातावरण तयार केले की, जसे काही आता मातोश्रीवर हल्ला होणार आहे. हे सर्व अनाकलनीय आहे. राज्यात अशा प्रकारे सरकारच कायदा आणि सुव्यवस्था खराब करणार असेल, तर हा विषय गांभीर्याने घ्यायची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
Video: बदल्यांचे आदेश परत घेण्याचे कारण काय ?; देवेंद्र फडणवीस

शिवसेना आज सत्तेत आहे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांची आहे. पण मातोश्रीवर कार्यकर्त्यांना जमा करून ते स्वतःच कायदा व सुव्यवस्थेची घडी बिघडवत आहेत. राणा दाम्पत्य आंदोलन करणार नव्हते, त्यामुळे त्यांना येवढा टोकाचा विरोध करण्याची गरज नव्हती. राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेतृत्व द्यायचे काम शिवसेना करीत आहे की काय, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com