कुरघोड्या टाळण्यासाठी शिवसेनेने केले जिल्हा नेतृत्वात विभाजन...

अकोला (Akola) जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वीपासून अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया असे दोन गट शिवसेनेमध्ये (Shivsena) पडले आहेत.
Nitin Deshmukh and Gopal Datarkar, Shivsena, Akola.
Nitin Deshmukh and Gopal Datarkar, Shivsena, Akola.Sarkarnama

अकोला : शिवसेनेच्या अंतर्गत राजकीय कुरघोडीवर मात करण्यासाठी जिल्हा नेतृत्वाचे विभाजन करीत दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील दोन विधानसभा मतदारसंघांसह एकूण तीन विधानसभांची जबाबदारी गोपाल दातकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, आमदार नितीन देशमुख यांच्याकडे दोन विधानसभा कायम ठेवण्यात आल्या आहेत.

अकोला (Akola) जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये (Shivsena) विधान परिषद निवडणुकीपूर्वीपासून अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया असे दोन गट शिवसेनेमध्ये पडले आहेत. त्यातून नेतृत्व बदलाची चर्चा केले काही महिन्यांपासून सुरू होती. दोन्ही गटांकडून त्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे शिष्टमंडळही पाठविण्यात आले होते. त्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केले होते. हीबाब शिवसेनेसाठी जिल्ह्यात मारक ठरणारी असल्याने खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेत शिवसेनेमध्ये नेतृत्व विभाजनाचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन जिल्हा प्रमुख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत माहिती देण्यात आली.

अशी असेल जबाबदारी..

आमदार नितीन देशमुख ः बाळापूर आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ

गोपाल दातकर ः अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट विधानसभा मतदारसंघ

सहसंपर्क प्रमुखामध्ये खांदेपालट

अकोला जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणून श्रीरंग पिंजरकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, नेतृत्व बदलाबाबत पक्षश्रेष्ठींकडे गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे श्रीरंग पिंजरकर यांना पक्षाने विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागेवर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य व ज्येष्ठ सहकार नेते सेवकराम ताथोड यांची अकोला जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Nitin Deshmukh and Gopal Datarkar, Shivsena, Akola.
आमदार मिटकरी यांच्या विरोधात अकोला पोलिसात तक्रार दाखल...

शहर प्रमुखांबाबत पुढील आठवड्यात निर्णय..

अकोला महानगरपालिका हद्दीत शिवसेनेचे सध्या दोन शहर प्रमुख कार्यरत आहेत. त्यात अकोला पूर्वची जबाबदारी अतुल पवनीकर यांच्याकडे तर अकोला पश्चिमची जबाबदारी राजेश मिश्रा यांच्याकडे आहे. गत काही दिवसांमध्ये शिवसेनेत झालेल्या अंतर्गत घडामोडीमध्ये शहरातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यामुळे शहर कार्यकारिणीतही लवकरच बदल केले जाण्याची शक्यता असून, शहर प्रमुखांबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आमदार देशमुखांचे कार्यकारिणीत वर्चस्व..

अकोला जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा कार्यकारिणीत आमदार नितीन देशमुख यांच्या गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. आमदार देशमुख यांचे निकटवर्तीय गोपाल दातकर यांच्याकडे तीन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुखपद सोपविण्यात आल्याने हा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com