बंडाळीच्या परिस्थितीत नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत !

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकावर एक धक्के बसत असताना नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंसोबत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे शिलेदार एक-एक करून शिंदेंना जाऊन मिळाले. या बंडखोरीने महाराष्ट्र ढवळून निघत आहे. अशाही परिस्थितीत सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्याचे चित्र विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आहे.

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या बंडाचे रूपांतर सत्तांतरामध्ये होणार का, हा प्रश्‍न महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रत्येक नागरिकाला पडला आहे. आज हे चित्र स्पष्ट होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदे गट हाच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा आज निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार आहे आणि शिवसेनेसाठी ही सर्वात धक्कादायक बाब आहे. त्यातच आज सकाळी रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. गेले अडीच वर्ष वर्षा बंगल्याचे दरवाजे आमच्यासाठी बंद होते, काल खऱ्या अर्थाने ते सामान्यांसाठी खुले झाले, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांना एकावर एक धक्के बसत असताना नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंसोबत आहेत. यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंपळे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अशा कठीण परिस्थितीत संयम ठेवून, जुने वैयक्तिक हेवेदावे विसरून पक्षासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. तर नागपूर युवासेनेचे जिल्‍हाप्रमुख विक्रम राठोड यांनी आज दुपारी २ वाजता रेशीमबागेतील शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्व पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे पुन्हा 'वर्षा'ची पायरी चढणार नाहीत...

काय म्हटलंय पत्रात ?

पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात यवतमाळचे जिल्हाप्रमुख म्हणतात, ‘शिवसेना पदाधिकारी व बांधवांनो..!!! जय महाराष्ट्र..!!! महाराष्ट्रात सध्या शिवसेनेत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक आमदार खासदार वेगळ्या गटात जाऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आव्हान देऊ पाहत आहेत. अशा वेळेस आपण सर्वांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत ताकदीने उभे राहणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी आमदारांनी व खासदारांनी अगदी कोणीही असो कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख शिवसेना व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहोत.

जिल्ह्यातील शिवसेना एकसंघ ठेवणे हे आपले सर्व पदाधिकाऱ्यांचे काम आहे. उद्या विरोधी पक्षात गेलो तरी आपण सर्व मिळून संघर्ष करू, पण यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा डौलानेच फडकत ठेऊ. तेव्हा सर्वांना विनंती की, ही परीक्षेची वेळ आहे. तेव्हा आपसी मतभेद, वैयक्तिक महत्वाकांक्षा, जुने वाद-विवाद सर्व बाजूला सारून संघटितपणे आपण सर्व या परिस्थितीला सामोरे जाऊ, अशी मी सर्व शिवसैनिकांना विनंती करीत आहे.

" जिल्ह्यात आवाज कुणाचा म्हटले .... शिवसेनेचा"

असाच प्रतिसाद जिल्ह्यात सर्वदूर आलाच पाहिजे "

तेव्हा संयम ठेवा व वरिष्ठांचे पुढील निर्देशांची वाट बघा.

जय महाराष्ट्र..!!!!

आपला नम्र - पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख, यवतमाळ जिल्हा’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com