गटबाजीचा फायदा घेत शिवसेनेतील नाराजांना गळाला लावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न !

एकनाथ शिंदे यांच्या ५० आमदारांच्या गटासोबत अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी गळाला लावण्याच्या दृष्टीने शिंदे (Eknath Shinde) गटाकडून अकोला जिल्ह्यात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama



अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ५० आमदारांच्या गटासोबत अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी गळाला लावण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडून अकोला (Akola) जिल्ह्यात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजीचा फायदा घेत नाराजांना गळाला लावण्याचा प्रयत्न या निमित्ताने होता दिसत असल्याची जोरदार चर्चा सध्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

शिवसेनेतील (Shivsena) गटबाजी गेल्या काही वर्षांपासून उघडपणे दिसून आली आहे. जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्याकडे जिल्ह्याचा प्रभार आल्यापासून माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया व आमदार देशमुख यांच्यात उभी फूट पडली आहे. माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या समर्थकांचाही एक गट आहे. या गटांकडून एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली जात नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही ही गटबाजी उघडपणे दिसून आली. परिणामी शिवसेनेचे उमेदवार आमदार बाजोरीया यांना भाजपचे (BJP) उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.



या पराभवानंतर जिल्ह्यातील शिवसेनेत पडलेली दरी कमी करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. उलटपक्षी आमदार नितीन देशमुख यांच्या गटातील जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्याकडे तीन विधानसभा मदरासंघाचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यामुळे बाजोरिया आणि देशमुख गटातील दरी आणखीनच वाढली आहे. त्यातच सुरुवातीला आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे गटासोबत सुरतला गेले होते. मात्र, नंतर ते गुवाहाटीवरून अकोल्याला परत आले होते. त्यानंतर आमदार देशमुख यांनी शिंदे यांच्यावर आरोपही केले होते. त्यामुळे शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजीचा फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिंदे गटातून जिल्ह्यात रेकी करण्यात आल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

Eknath Shinde
video: 'ही तुटलेली शिवसेना कोणी बघू शकत नाही'



आमदार बच्चू कडूंची जवळीकता..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असताना अकोला जिल्ह्यात ३५ कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता. शिंदे गटात सहभागी झालेले तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मंत्रालयानेही जिल्ह्यात जवळपास एक हजार कोटींच्या १३ पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या. तत्कालीन कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या मंत्रालयाकडूनही कामे मंजूर झाली आहेत. तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू हेही शिंदे गटात सहभागी झाले असून, त्यांनीही शेत, पांदण रस्तेही मंजूर केले होते. त्यांची अकोला जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत असलेली जवळीकता बघता शिंदे गटाकडून शिवसैनिकांना गळाला लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

कोणता झेंडा घेऊ हाती?
भाजप व शिवसेना युती असल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय कठीण आहे. त्यामुळे सध्या शिवसैनिकांची घालमेल सुरू आहे. शिवसेनेसोबत राहिलो तर एकटे लढवे लागू शकते. शिंदे गटासोबत गेलो तर भाजपसोबतच्या युतीचा फायदा होईल, असे गणित मांडले. त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था सध्या शिवसैनिकांची झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com