Electiion : शिंदे-फडणवीसांनी दखल घेतली नाही; पाचही उमेदवार देऊ, ‘अन् मंग पुढची पुढं...’

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू स्वतंत्रपणे ही निवडणूक लढण्यासाठी तयार झाले आहेत.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Graduate and Teacher Constituency Elections : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या तयारीने वेग पकडला आहे. शिक्षक संघटनांसह राजकीय पक्षांचे पुढारी सज्ज झाले आहेत. सर्वांची रणनीती तयार होत आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारला पाठिंबा ज्यांनी दिला, ते आमदार बच्चू कडू स्वतंत्रपणे ही निवडणूक लढण्यासाठी तयार झाले आहेत.

आज अमरावतीमध्ये (Amravati) त्यांनी ही घोषणा केली. या घोषणेतून त्यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारसोबत असताना त्यांच्या विरोधात लढणार का, असे विचारले असता बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही ही निवडणूक लढण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. पण त्यांनी आमची दखल घेतली नाही. त्यामुळे ही निवडणूक आम्ही मेस्टा संघटनेसोबत लढणार आहो. आता प्रस्थापितांच्या विरोधात लढायचे ठरवले आहे आणि माघार घेणार नाही. काय होईल ते पुढचे पुढे पाहू, असे ते म्हणाले.

नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. काही संघटना आणि राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले आहेत, तर काहींना आपले पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. पण बच्चू कडूंच्या आजच्या निर्णयामुळे यावेळची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार, हे मात्र निश्‍चित.

Bacchu Kadu
Bachchu Kadu : 'मूर्ख आहोत का आम्ही', बच्चू कडू सरकारवर संतापले

आमदार बच्चू कडूंची प्रहार संघटना व मेस्टा संघटना पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक भाजप - शिंदे गट सोबत लढणार होतो, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाची दखल घेतली नसल्याचा आरोप करत बच्चू कडूंनी दंड थोपटले आहेत. प्रहार संघटना व मेस्टा संघटनेकडून शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांत प्रचंड मेहनत घेतली. आमचे २ लाख मतदार आहेत. राज्यातील शिक्षक व पदवीधरचे पाचही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील. नंतर काय होते ते पुढचे पुढे पाहून घेऊ, असे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in