Sharad Pawar : शरद पवारांच्या काही गोष्टी मी गांभीर्याने घेत असतो, असं का म्हणाले मुख्यमंत्री ?

Eknath Shinde : जबरदस्ती कुठलाही प्रकल्प करण्याच्या मानसिकतेत सरकार नाही.
Eknath Shinde and Sharad Pawar
Eknath Shinde and Sharad PawarSarkarnama

Eknath Shinde on Sharad Pawar's Statement in Nagpur : बारसू रिफायनरी प्रकरणावर संदर्भात पवार यांच्याशी काल चर्चा झालेली आहे. उद्योगमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. लोकांवर अन्याय करून जबरदस्ती कुठलाही प्रकल्प करण्याच्या मानसिकतेत सरकार नाही. समृद्धीला सुरुवातीला विरोध होता, नंतर लोकांनी सहकार्य केलं, बारसूतही भूमिपुत्रांना विचारात घेऊन हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Samruddhi Higjway was initially opposed)

आज (ता. २७) नागपुरात पत्रकारांशी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, लगेच काही प्रकल्प उभा होणार नाही. सॉईल टेस्टिंग होईल आणि बरीच प्रक्रिया बाकी आहे, ती पूर्ण होईल, त्यामुळे भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेऊ, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या सभा आणि पाठीत वार करून सरकार पाडले’, या वक्तव्यांबद्दल विचारले असता, उद्धव ठाकरे रोज बोलतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत नुकतीच खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतली. त्याबद्दल विचारले असता, काहीही उत्तर न देता एकनाथ शिंदे यांनी हात जोडले.

कर्करोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी अतिशय भव्य दिव्य असा हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. अतिशय अप्रतिम असं कॅन्सर हॉस्पिटल आज उभं झालं आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशस्त जागेत हे हॉस्पिटल तयार झाले आहे. नागपुरातील (Nagpur) जागतिक दर्जाचे कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शरद पवार मोठे नेते आहेत. ते बोलले त्याचा अर्थ तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. त्यांना कोणती भाकरी फिरवायची आहे ते पवारांनाच विचारा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांवरील प्रश्न शिताफीने टोलवला. भाकरी फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आता आली आहे, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. त्याविषयी विचारले असता ते त्यांनाच विचारा असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde and Sharad Pawar
Eknath Shinde News: 'सुपरफास्ट CM'; गावीही शिंदेंचा कामाचा धडाका; तीन दिवसांत ६५ फाईल्सचा निपटारा...

काल माझी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) फोनवर चर्चा झाली. ते म्हणाले, लोकांना विश्‍वासात घेतले पाहिजे. मीसुद्धा त्यांना सांगितले की, लोकांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बारसुचा प्रकल्प पुढे नेणार नाही. पवार बोलले की त्यांच्या काही गोष्टी गांभीर्याने घेत असतो, असेही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com