शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना ज्ञान द्यावे, आम्हाला नाही...

मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांना नोटीस दिली पाहिजे, असे भाजप नेते किरीट सोमय्या (Kiriy Somayya) म्हणाले.
शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना ज्ञान द्यावे, आम्हाला नाही...
Kirit Somayya, sharad Pawar, Uddhav Thackeray and Sanjay Raut.Sarkarnama

नागपूर : उद्धव ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, माझे घोडे पळाले. वसुली करणारे ठाकरे सरकार आमदारांवर आरोप करत आहे. याची गंभीर नोंद निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांना नोटीस दिली पाहिजे, असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.

आमदारांना विकाऊ म्हणणाऱ्यांनी पुरावे दिले पाहिजेत. जर पुरावे मिळाले तर भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना ही सारी दिव्यदृष्टी मतदान झाल्यानंतर जे भाषण केलं. त्यामध्ये ‘करून दाखवलं, चारच्या चारही जागा जिंकणार’, असं जे बोलत होते. त्यावेळी ही बुद्धी कुठे गेली होती, असा सवाल सोमय्या (Kirit Somayya) यांनी विचारला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात की रेट कार्ड निघालं होतं. भाजपने रेट जास्त दिले म्हणून त्यांचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा आमदारांना विकत घ्यायला निघाले होते, आणि त्यांना रेट पटले नाही म्हणून घेतले नाही, असाच याचा अर्थ होतो. असे बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना त्यांच्या वक्तव्याचे पुरावे द्यावेच लागणार आहेत. माझेच आमदार माझ्या नियंत्रणात नाही, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची काय अवस्था करून ठेवली आहे? मला त्यांची कीव येते, असेही सोमय्या म्हणाले.

Kirit Somayya, sharad Pawar, Uddhav Thackeray and Sanjay Raut.
किरीट सोमय्या म्हणाले, तेरा क्या होगा कालिया?

राज्यसभा निवडणूक म्हणजे ट्रेलर होता. आता यापुढे विधानपरिषदेची निवडणूक आहे, त्यातही हेच होईल आणि पूर्ण पिक्चर तर मुंबई महानगरपालिकेत दिसणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने निर्धार केला आहे की या वसुलीखोर सरकारला धडा शिकवायचा. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना साफ होणार आणि मग उद्धव ठाकरे घरी जाणार. आता शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना ज्ञान द्यावे, आम्हाला सांगण्याची गरज नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले. शरद पवारांनी असं म्हटलंय की, हा निकाल आम्हाला अपेक्षित होता. तरीही धाडस करून आम्ही निवडणूक लढवली. या वक्तव्याबद्दल विचारलेल्या प्रश्‍नावर सोमय्यांनी उपरोक्त उत्तर दिले.

प्राध्यापिका मेधा सोमय्या यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न केला गेला. त्यासाठी संजय राऊत यांना अटक होणार. कोर्टानेदेखील हे निदर्शनास आणून दिलं आहे की, संजय राऊत यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. कुठलेही पुरावे नसताना त्यांनी हे केलंय. त्यामुळे त्यांना उत्तर द्यावे लागणार, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in