Congress : ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे म्हणाले, देश परिवर्तनासाठी गांधींसोबत चला...

काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग वाढावा यासाठी चंद्रपूरात (Chandrapur) नुकतीच बैठक घेण्यात आली.
Balu Dhaorkar, Congress
Balu Dhaorkar, CongressSarkarnama

चंद्रपूर : केंद्रात भाजप सत्ता आल्यापासून देशात स्वायत्त संस्थांना स्वातंत्र्य उरलेले नाही. हिंदुत्ववादी विचारांच्या सत्ताधाऱ्यांनी या देशाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा परिवर्तनाची गरज असून, "गांधींसोबत चला" असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी केले.

काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग वाढावा यासाठी चंद्रपूर (Chandrapur) शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत संवाद आणि चर्चा नुकतीच हॉटेल एन डी येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला व्यासपीठावर खासदार बाळू धानोरकर, (Balu Dhanorkar) आमदार सुभाष धोटे आमदार प्रतिभा धानोरकर (Prathbha Dhanorkar) यांची उपस्थिती होती. भारत जोडो यात्रेने ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला. या यात्रेला समर्थन देण्यासाठी चंद्रपूर शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि पत्रकारांशी संवाद व चर्चा घडवून आणण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ गांधी विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी गांधीजी ते गांधी पर्यंतचा प्रवास उघडला. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर झालेल्या सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराची मांडणी केली. मागील आठ-दहा वर्षांपासून सत्ताकारणात घडलेल्या घडामोडी आणि देशाचे भवितव्य यावर त्यांनी विवेचन केले. या बैठकीचे प्रास्ताविक खासदार बाळू धानोरकर यांनी केले, तर आभार विनोद दत्तात्रय यांनी मानले.

Balu Dhaorkar, Congress
Bharat Jodo Yatra News : राहुल गाधींच्या भारत जोडो यात्रेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

‘भारत जोडो’त खासदार बाळू धानोरकर सहभागी..

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून, नांदेड जिल्ह्यामध्ये पदयात्रा सुरू आहे. आज सकाळी पावणेसहा वाजता कापसी गुफा येथून पदयात्रेला प्रारंभ झाल्यानंतर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. सकाळी ५.४५ वाजता कापशी गुंफा येथून पदयात्रा प्रारंभ झाली. चांदासिंघ कॉर्नर, नांदेड पोहचली. या मार्गात खासदार बाळू धानोरकर सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com