मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून देणे, हीच डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली...

बाबासाहेबांनी स्वस्त मुबलक विजेसाठी काही उपाय सुचविले होते. त्यासाठी त्यांनी केंद्रीय व्यवस्था (Centralised System) सुचविली होती, असे खासदार धानोरकर (MP Balu Dhanorkar) म्हणाले.
Mp Balu Dhanorkar
Mp Balu DhanorkarSarkarnama

नागपूर : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे. केवळ जयंती, महापरिनिर्वाण दिन असे कार्यक्रम करून आपली जबाबदारी संपत नाही, तर बाबासाहेबांचे कार्य त्यांचे आदर्श, प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल, तरच त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढीला दिशा देता देईल, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केले.

आज चंद्रपूर (Chandrapur) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यासोबतच काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिनेश चोखारे, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष पवन अंगदारी, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल राजा, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस ज्येष्ठ नेत्या अश्विनी खोब्रागडे, युवा नेते सुनील पाटील, बाळू डांगे, आकाश कोडापे, दिनेश शिरपूरकर, निर्मल जगताप, कपिल भस्मे, धनराज पुराणे, सोनू देशपांडे, सुयोग खोब्रागडे, युवराज खोब्रागडे, डेजी सोनडुले, रेखा बारसागडे, शुभम पारखी, धीरज रामटेके. सूरज रत्नपारखी यांची उपस्थिती होती.

खासदार बाळू धानोरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणी, समाजकारणी होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण, अत्यंत विद्वान, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेबांची ओळख आहे. सप्टेंबर १९४३ मध्ये विद्युत आणि सार्वजनिक कामे या विषयावरील एक कमिटी तत्कालीन व्हाइसरॉबच्या सरकारने गठीत केली होती. या विभागाचे मंत्री या नात्याने डॉ. बाबासाहेब या कमिटीचे प्रमुख होते. त्यांनी स्वस्त मुबलक विजेसाठी काही उपाय सुचविले होते. त्यासाठी त्यांनी केंद्रीय व्यवस्था ( Centralised System ) सुचविली होती, असे खासदार धानोरकर म्हणाले.

Mp Balu Dhanorkar
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

मुबलक वीज कशासाठी, या विषयावर औद्योगिकीकरणासाठी, औद्योगिकीकरण कशासाठी? तर गरिबीच्या चिरंतन फेऱ्यातून लोकांना मुक्त करण्यासाठी, असे विचार त्यांनी त्यांच्या अहवालात व्यक्त केले आहेत. १९४८ मध्ये विद्युत अधिनियम अस्तित्वात आला. स्वातंत्र्यानंतर सरकारी क्षेत्रात विद्युतनिर्मिती आणि वितरणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले. त्यामुळे ऊर्जामंत्री म्हणून त्यांचे अतुलनीय योगदान आहे. राष्ट्राची जलनीती ठरविण्यातसुद्धा डॉ. बाबासाहेबांची प्रमुख भूमिका वठवली आहे. अनेक महाकाय धरणे बांधण्याच्या कामांत बाबासाहेब सहभागी झाले होते, ज्याला देशाचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक मंदिरे असे संबोधले.

१९३५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. यासाठीसुद्धा व्यापक आर्थिक दृष्टिकोन अभ्यासाचा महत्त्वाचा वाटा आहे, असा विचार मांडणाऱ्या डॉ. बाबासाहेबांचे विचार आधुनिक भारताला तारणारे आहेत. सर्वांनी याच मार्गावर चालण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com