लोकांचे हाल बघून आमदार मुनगंटीवार वेकोलिच्या महाप्रबंधकावर बरसले, म्हणाले...

चंद्रपूर (Chandrapur) जिल्‍हयातील वरोरा तालुक्‍यातील पुरस्थितीचा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी काल आढावा घेतला.
MLA Sudhir Mungantiwar
MLA Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सर्वत्र पूर परिस्थिती आहे. पण चंद्रपूर जिल्ह्यात या परिस्थितीसाठी वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड लि.) जबाबदार आहे. वेकलिच्या ओव्हर बर्डन डम्पिंगमुळे पावसाचे पाणी गावांत शिरले. पण वेकोलिने नागरिकांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार चांगलेच संतापले आणि मुख्य महाप्रबंधकाला खडसावले.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्‍हयातील वरोरा तालुक्‍यातील पुरस्थितीचा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी काल आढावा घेतला. गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्‍ट्रात (Maharashtra) पुरस्थिती निर्माण झाली आहे. तशीच स्थिती चंद्रपूर जिल्‍हयात सुध्‍दा आहे. जिल्‍हयातील जवळपास सर्व तालुक्‍यांमध्‍ये पुरस्थिती गंभीर आहे. आमदार मुनगंटीवार यांनी मुंबईहून (Mumbai) झुमच्‍या माध्‍यमातून बैठका घेवून यावर उपाययोजना करण्‍यास सांगीतले आणि काल तातडीने मुंबईहून वरोरा तालुक्‍यातील पूरग्रस्त गावांना त्‍यांनी भेटी दिल्‍या.

वरोरा शहरातील साई मंगल कार्यालयात वास्‍तव्‍याला असलेल्‍या नागरिकांना भेटून त्‍यांच्‍या समस्‍या समजून घेतल्‍या. अधिकारी व पदाधिका-यांना त्‍यावर त्‍वरीत उपाययोजना करण्‍यास सांगीतले. माजी नगराध्‍यक्ष अहेतेशाम अली व त्‍यांच्‍या चमुने यासर्व नागरिकांच्‍या समस्‍यांकडे गांभीर्याने लक्ष देवून त्‍यांना योग्‍य ती मदत करावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्‍यानंतर कुचना गावाला भेट दिली असता तेथील प्राथमिक शाळेत पळसगांवचे १२१ नागरिक व थोरानाचे ४७ नागरिक वास्‍तव्‍यास होते. तिथे जेवण मिळत नसल्याचे लोकांनी सांगितले. त्‍यावर या नागरिकांना धान्‍य देण्‍याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले.

पळसगांवला वेकोलिच्‍या ओबी डम्पींगमुळे गावात पाणी शिरले, असा आरोप तेथील नागरिकांनी केला. वेकोलिचे अधिकारी अशा पुरस्थितीत नागरिकांना कुठलीही मदत करीत नाही, असे सुध्‍दा नागरिकांनी सांगीतले. पिण्‍याच्‍या पाण्‍याची स्थिती सुध्‍दा खराब असल्‍याचे त्यांच्या लक्षात. त्‍यावर आ. मुनगंटीवार यांनी ताबडतोब वेकोलिच्‍या मुख्‍य महाप्रबंधक यांच्‍याशी कॉल करून खडसावले.

MLA Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार थेटच बोलले, म्हणाले तुम्ही गेले नाही म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाही जयंतराव..!

पाटाळा हे गांव पूर्णतः पुराच्‍या तडाख्‍यात सापडले आहे. या गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची संपूर्ण व्‍यवस्‍था पूर्णपणे खराब झाली आहे. त्‍याकरिता मजिप्राला याची माहिती देवून नविन अंदाजपत्रक तयार करावयास सांगावे असे आमदार मुनगंटीवार यांनी पदाधिका-यांना सांगीतले. या गावात लाईट सुध्‍दा बंद आहे व पुढील अनेक दिवस येणार नाहीत अशी माहिती आहे. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा टॅंकरच्‍या माध्‍यमातुन होत आहे. गावातील नविन पुलाचे काम अतिशय निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याचे नागरिकांनी सांगीतले. त्‍यामध्‍ये फ्लाय अॅश वापरली गेली आहे, जी पुरामुळे शेतांमध्‍ये वाहून आली. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. अशा कंत्राटदाराला बोलावून त्‍याच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात यावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी अधिका-यांना दिले. गावातील लोकांची जेवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देश त्यांनी पदाधिका-यांना दिले.

त्‍यानंतर आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिका-यांशी बोलून या सर्व गावांमध्‍ये चा-याची व्‍यवस्‍था त्‍वरीत करण्‍याची सुचना केली. तसेच प्रत्‍येक कुटूंबाला नियमानुसार धान्‍य देण्‍याची सुचना सुध्‍दा त्‍यांनी केली. ज्‍यांच्‍या घरात पुराचे पाणी गेले आहे अशा कुटूंबांना ताबडतोब मदत म्‍हणून १० हजार रूपये देवू शकतो काय, याची चौकशी करण्‍याचे निर्देशही त्यांनी दिले. दौ-याचा शेवट घुग्‍गुस शहरात झाला.

या दौ-यात आ. मुनगंटीवार यांच्‍यासोबत भाजपाचे ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, वरोराचे माजी नगराध्‍यक्ष अहेतेशाम अली, माजी जि.प. सदस्‍य नरेंद्र जिवतोडे, बाबाभाऊ भागडे, उपविभागीय अधिकारी शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी, विवेक बोढे, विनोद चौधरी, नितु चौधरी, अमित गुंडावार, प्रविण सुर, मनोज तिखट, सुचिता ताजने, मंगेश महातळे, संदीप एकरे, पांडूरंग आगलावे, प्रदिप मांडवकर, शंकर विधाते, भारत मोहीतकर आदी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in