खासदार नवनीत राणांविरोधात दुसऱ्यांदा अजामीनपात्र अटक वॉरंट

बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणाच्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी. तसेच, सुनावणीस गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी, यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या वकिलाकडून अर्ज करण्यात आला होता.
Navneet Rana
Navneet RanaSarkarnama

मुंबई : अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. बनावट जात प्रमाणपत्रावरून ही मुंबईतील (mumbai) न्यायालयाने ही कारवाई केली आहे. या दोघांविरोधात दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे, त्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Second time non-bailable arrest warrant against MP Navneet Rana)

नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी न्यायालयाने राणा आणि त्यांच्या वडिलांना सहा सप्टेंबर रोजीच्या सुनावणीस गैरहजर राहण्यास परवानगी दिली होती. पण, हे दोघे २२ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीलाही गैरहजर राहिले, त्यामुळे न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

Navneet Rana
अटकेच्या भीतीने राष्ट्रवादीचे नेते सपाटे झाले गायब; शिक्षिकेकडून अत्याचाराची फिर्याद

बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणाच्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी. तसेच, सुनावणीस गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी, यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या वकिलाकडून अर्ज करण्यात आला होता. राणा यांचा अर्ज फेटाळून लावत शिवडी न्यायालयाने राणा आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात पुन्हा अजामानपात्र अटक वॉरंट जाहीर केले आहे. त्यामुळे खासदार राणा यांच्या अडचणीत वाढली आहे. या दोघांना पुढच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. कोर्टात हजर राहायचे नसल्यास सत्र न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.

Navneet Rana
अमेठी जिंकली तिथं मोहोळची काय कथा : भाजप जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टींचं विधान

मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करून दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला हेाता. त्यामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. पण, नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने २२ जून २०२१ रोजी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com