सर्वसामान्यांना सीट बेल्टचा दंड; मग दोषी सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा ?

नुकताच प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyres Mistri) यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सीट बेल्ट लावला असता, तर ते वाचले असते.
Cyres Mistri
Cyres MistriSarkarnama

नागपूर : नुकताच प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सीट बेल्ट लावला असता, तर ते वाचले असते, असा निष्कर्ष काढला गेला व लगेच सरकारतर्फे (Govrnmnt) गाडीमधील मागील आसनांवर बसणाऱ्यांनी सीट बेल्ट न लावल्यास रुपये १००० दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा केली गेली. पण जेथे अपघात झाला, त्या पुलाचे डिझाईन चुकीचे होते, असा निष्कर्ष फॉरेन्सीकने काढला आहे. तेव्हा त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा करणार, असा प्रश्‍न जनमंचच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

वरील अपघाताची पाहणी करीत असलेल्या फॉरेन्सिक चमुने, अपघाताचे कारण ज्या पुलाजवळ अपघात झाला, त्या पुलाचे चुकीचे डिझाईन असल्याचे म्हटले आहे. परंतु मुळात अपघात ज्या पुलाच्या चुकीच्या डिझाईनमुळे झाला, त्याबद्दल व चुकीच्या पद्धतीने पुलाचे बांधकाम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार, याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. म्हणजेच अपघातास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईची घोषणा नाही, परंतु सर्वसामान्यांवर मात्र सीट बेल्ट नाही लावला तर कारवाईची तत्परतेने घोषणा हे दुर्दैवी आहे.

रोज वृत्तपत्रांमध्ये खड्ड्यांमुळे, चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गतिरोधक व रस्ता दुभाजकांमुळे, रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांवर आदळून तसेच रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या असतात. परंतु हे सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये खेदाने नमूद करावे लागते, असे जनमंचचे म्हणणे आहे.

Cyres Mistri
सायरस मिस्री हे माझ्या नंतरच्या पिढीच्या लोकांचे प्रतिनिधी होते; पवारांनी व्यक्त केलं दु:ख

पहिले रस्ते खड्डे मुक्त करा, रस्त्याचे बांधकाम सुरक्षिततेचे नियम लक्षात घेऊन करा, सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा व बांधकामांमधला भ्रष्टाचार संपवा, नंतरच सर्वसामान्यांवर दंड आकारणी करा, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप, महासचिव विठ्ठलराव जावळकर, खरसने, एडवोकेट मनोहर रडके, टी.बी. जगताप, कोरडे, रामेकर, देवळे, शिंदे ,प्राध्यापक शरद पाटील, प्रमोद पांडे, रमेश बोरकुटे व इतर सदस्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in