MLA Sawarkar : सावरकरांची सरचिटणीसपदी नियुक्ती ठरू शकते मंत्रिपदासाठी अडचण...

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे.
MLA Randhir Sawarkar, Devendra Fadanvis
MLA Randhir Sawarkar, Devendra FadanvisSarkarnama

अकोला : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. वास्तविकतः नजीकच्या काळात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा सावरकर यांना होती. पण आता प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल की नाही, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करून पक्षाने आमदार सावरकर यांना मंत्रिपदासाठी हुलकावणीच दिली, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आमदार रणधीर सावरकर (MLA Randhir Sawarkar) हे गेले अडीच वर्षांपासून अकोला (Akola) जिल्हा भाजप (BJP) अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत. खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात त्यांनी कुशल संघटक म्हणून केलेले काम बघता त्यांना प्रदेश कार्यकारिणीतील सरचिटणीस पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. ते अकोला पूर्व मतदार संघातून दोनदा विजयी झाले आहेत. निशांत सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून तसेच मराठा मंडळ व विविध सामाजिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे.

मंत्रिपदाबाबत साशंकता..

आमदार रणधीर सावरकर यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा केली जात होती. त्यापूर्वीच त्यांना पक्षाने संघटनात्मक जबाबदारी सोपवून सरचिटणीस पदी नियुक्ती दिली आहे. त्यांची ही नियुक्ती मंत्रिमंडळातील वर्णीसाठी अडचणीची ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

MLA Randhir Sawarkar, Devendra Fadanvis
शेतकऱ्यांच्या जिवनात समृद्धीचा दिवा उजळू दे : आमदार रणधीर सावरकर

जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभारही कायम..

भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार रणधीर सावरकर यांनी नियुक्ती अडीच वर्षांपूर्वी करण्यात आली होती. भाजपच्या संघटनात्मक नियमानुसार तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असते. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही आमदार रणधीर सावरकर यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com