सरसंघचालक म्हणाले, आम्ही मंदिराबाहेर दंडे घेऊन रखवाली करणारी माणसे...

संपूर्ण समाजाने वाईट विचार केला, तर त्यातून गुंडागर्दी निर्माण होऊ शकते. वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचं मन चांगलं बनावं, असे डाॅ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagawat) यांनी गद्दीनशिणी समारोह समारंभात सांगितले.
सरसंघचालक म्हणाले, आम्ही मंदिराबाहेर दंडे घेऊन रखवाली करणारी माणसे...
Dr. Mohan BhagawatSarkarnama

अमरावती : धर्मपीठावर बसने हे औचित्य भंग आहे, धर्मपिठावर कुणाचे पीठाधीपती म्हणून नियुक्ती होत असताना त्या ठिकाणी माझे काम नाही. मंदिराच्या आत आमचं काही काम नसून, मंदिराच्या बाहेर दंडा घेऊन रखवाली करण्याचं आमचं काम आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagawat) म्हणाले.

डॉ. भागवत संत कवरराम धाम येथे गद्दी मशिनी या कार्यक्रमासाठी अमरावतीत (Amravati) आले होते. मंदिराच्या आतमधील गोष्टी आमच्या मर्यादेत नाही, बाहेर राहून रखवाली येवढेच आमचे काम आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मी संघाचा सरसंघचालक आहे. मी सरकार मध्ये जात नाही. सरकारने एकच गोष्टी माझ्यावर थोपवली, ती म्हणजे सरकारने दिलेली सिक्युरिटी. परंतु जेव्हा मी समाजात जातो आणि काही लोक मला काही मागणी करतात तेव्हा मी ती मागणी सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

सिंधी बांधवांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सिंधी विद्यापीठाची मागणी केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त वक्तव्य केलं. सरकारवर समाजाचा दबाव असेल तर सरकार त्या गोष्टी करते. सरकारच्या नावातच स म्हणजेच सकारात्मकता व रकार म्हणजे सरकार असेपर्यंत सरकार करेल. मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असते, मग ते सरकार कोणतेही असो सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते.

Dr. Mohan Bhagawat
'येत्या 20 ते 25 वर्षांत पुन्हा अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होईल'- मोहन भागवत

समाज ठरवेल तेच आणि तोपर्यंतच सरकार राहू शकते असे सांगून संपूर्ण समाजाने एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. संपूर्ण समाजाने वाईट विचार केला, तर त्यातून गुंडागर्दी निर्माण होऊ शकते. वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचं मन चांगलं बनावं, असे मोहन भागवत यांनी भानखेडा स्थित संत कंवरराम धाम मध्ये गद्दीनशिणी समारोह समारंभात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.