घरकुलांसाठी आमदार बावनकुळेंच्या नेतृत्वात सरपंच आज एनएमआरडीएवर धडकणार…

आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत तेथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. घरकुलाचे पैसे देण्यात काय अडचणी आहेत, याबाबत चर्चा केली जाणार आहे.
घरकुलांसाठी आमदार बावनकुळेंच्या नेतृत्वात सरपंच आज एनएमआरडीएवर धडकणार…
MLC Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील गरीब नागरिकांना घरकुलाचे पैसे देण्यास एनएमआरडीएकडून टाळाटाळ केली जात आहे. या विरोधात आज दुपारी १२ वाजता तालुक्यातील सरपंच जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांच्या नेतृत्वात एनएमआरडीएच्या (NMRDA) कार्यालयावर धडकणार आहेत.

राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLC Chandrashekhar Bawankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत तेथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. घरकुलाचे (Gharkul) पैसे देण्यात काय अडचणी आहेत, याबाबत चर्चा केली जाणार आहे. चर्चेतून तोडगा न निघाल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे. घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेल्या लोकांना अद्याप अर्धी रक्कमही देण्यात आलेली नाही. तरीही त्यांनी उसनवार करून काही बांधकाम करून घेतले. पण अनेक घरांवर छत पडले नाही आणि पावसाळा तोंडावर आला आहे.

अशा परिस्थितीत घरांवर तात्काळ छत न पडल्यास लोकांनी अर्धवट केलेले बांधकामही वाया जाण्याची शक्यता आहे. घरकुलाचे उर्वरित पैसे मिळावे, या मागणीसाठी लोकांनी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. काही सरपंचांनीही या मागणीचा पाठपुरावा केला. पण एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही ही मागणी लावून धरली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे ही बाब आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितली. त्यांनी आज तालुक्यातील सर्व सरपंचांना एमएमआरडीए कार्यालयात दुपारी १२ वाजता येण्यास सांगितले असल्याचे मोहन माकडे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

गोरगरिबांना घरांचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक करण्यासारखा हा प्रकार आहे. सरकारच्या योजनेला एनएमआरडीच सुरुंग लावत असल्याचा आरोप केला जात आहे. सरकारकडून लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी ६० हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. पण नियमांची कारणे सांगून ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे. नकाशे बनवून मग घरे बांधा, असे सांगण्यात आले आहे. पण गावातील गरीब लोक ३०० चौरस फुटाच्या जागेवर सगळा तामझाम करून घरे कशी बांधणार, हा प्रश्‍न आहे. नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्यामुळे शासनाकडून आलेले पैसे अडवून ठेवण्यात आले असल्याचा आरोप मोहन माकडे यांनी केला आहे.

MLC Chandrashekhar Bawankule
बावनकुळे कडाडले; म्हणाले, ‘महाविकास’च्या ओबीसी मंत्र्यांनी आता पदावर राहू नये...

जुनी गावे एनएमआरडीच्या नव्हे तर ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतात. बांधकामात काही कमी जास्त झाले असेल, तर तो ग्रामपंचायतीचा विषय आहे. त्यासाठी एनएमआरडीने पैसे अडवण्याचे काही कारण नाही. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरांवर छत न पडल्याने अख्ख्या तालुक्यातील लोक त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत १ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यात जेवढे बांधकाम झाले, तेवढे लोकांनी केले. आता पैशाअभावी काम थांबले आहे. ज्यांनी घरे बांधली आणि ज्यांचे अर्धवट आहेत, अशा दोन्ही लाभार्थ्यांना केवळ १ लाख रुपये मिळाले आहेत. आता उर्वरित रक्कम देऊन त्यांची घरे पूर्ण करावी, या मागणीसाठी आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे मोहन माकडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in