Sarkarnama Impact : आरएसएस प्रचारकांवर भडकलेला अकोल्यातील भाजपचा ‘तो’ नेता संघाच्या रडारवर !

Sarkarnama Impact : नागपुरात संघ मुख्यालयात झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
RSS and BJP
RSS and BJPSarkarnama

Akola Political News : अकोला जिल्ह्यातील भाजपच्या एका वजनदार नेत्याने पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाचा अवमान केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यानंतर ८ सप्टेंबरला या घटनेकडे लक्ष वेधत ‘सरकारनामा’ने सर्वप्रथम या वादाबाबतीतले राजकारण उलगडले. त्यातून पक्षाच्या बळावर मोठा झालेला ‘तो’ नेता संघाच्या प्रचारकांना जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले. (It is reported that the issue was also discussed in the meeting held at the RSS headquarters in Nagpur)

‘सरकारनामा’ने याबाबत सविस्तर वृत्तांकन केले. त्याची चर्चा संघ आणि भाजपच्या वर्तुळात जोरदार झाली आणि संघ प्रचारकांना उद्धट बोलणारा ‘तो’ नेता कोण, यावर वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा झाली. तो नेता संघाच्या नजरेत भरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढच्या काळात या नेत्याची गय केली जाणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे संघ आणि तो नेता यांच्यातील शीतयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.

‘त्या’ बातमीची जोरदार चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्तुळ आणि भाजपच्या गोटात आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी नागपुरात संघ मुख्यालयात झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेबद्दल सर्वाधिक राग आणि चीड ही संघ वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारे प्रचारकांचा अपमान संघ स्वयंसेवक कदापि सहन करू शकत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया संघ आणि भाजपमध्ये उमटत असल्याची माहिती आहे.

भाजपचा ‘तो’ नेता कोण, अशी विचारणा करणारा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचा कॉल आज (ता. १२) ‘सरकारनामा’च्या नागपूर (Nagpur) कार्यालयात आला होता. ‘तो’ नेता कोण, अशी विचारणा त्यांनी केली. संघ प्रचारकांना उर्मट वागणूक देणारा नेता कोण, हे जो तो आपआपल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या या नेत्याला अकोला जिल्ह्यात ‘हिटलर’ या नावाने ओळखले जात असल्याचे सूत्र सांगतात.

भाजपचे (BJP) कार्यकर्ते नेत्यांच्या अशा अरेरावी वागणुकीने त्रस्त असताना आता थेट संघ प्रचारकाला असा अनुभव आल्याने या अरेरावीचा संताप आता व्यक्त केला जात आहे. कार्यकर्त्यांना पदे देणार नाही. काहीच लोकांच्या भोवती पक्ष संघटना गुंडाळून ठेवण्यात आल्याने इतर कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे.

अकोल्यातील (Akola) एका भाजप नेत्याने संघ प्रचारकाला वेटिंगवर ठेवत अपमानास्पद वागणूक दिल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. त्यामुळे या भाजप नेत्याच्या पायाखालची तर वाळू सरकलीच त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांमध्येदेखील चलबिचल वाढली आहे. अकोल्यातील भाजप नेत्यांचे हे वागणे नेमके कशाचे प्रतीक आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

RSS and BJP
Akola Kawad Yatra : अकोल्यातील कावड उत्सवात राजकीय पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन !

अनेकांनी सोशल मिडियावर हे हुकूमशाहीचे प्रतीक असल्याच्या कमेंट्स टाकल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हे कायम संपर्क दौऱ्यावर असतात. या संपर्क दौऱ्यात या संघ प्रचारकाने भाजपच्या एका नेत्याच्या घरी सदिच्छा भेट दिली. पण, या सदिच्छा भेटीत या संघ प्रचारकाला वाईट अनुभव आला. या नेत्यामध्ये अहंगंड शिरल्याची प्रचिती संघ प्रचारकाला झाली.

संघ प्रचारक सर्वसंग परित्याग करून संघ कार्याला वाहून घेतलेले असतात. पण, या भाजप नेत्याच्या घरी गेल्यावर प्रचारकाला नाहक ताटकळत ठेवण्यात आले. इतकेच नाही तर भाजप नेत्याने अगदी अपमानास्पद वागणूक देत अपमानित केले. मुळात संघ परिवारातील विविध संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अस्तित्व आणि कार्यशैलीमुळेच भाजप अस्तित्वात आली.

नातेवाइकांच्या जिवावर राजकारणात आलेल्यांना त्याचा काय तो गंध, असा टोला संघ स्वयंसेवक लगावतात. संघ प्रचारकाला दिलेली वागणूक ही अपमानास्पद असण्यामागे नेत्यांचा अहंकार समोर आला आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठी किती विश्वास दाखवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

RSS and BJP
Akola Politics News: अकोला लोकसभेसाठी 'वंचित'सोबत युती किती फायद्याची ठरेल ? ठाकरेंनी घेतला कानोसा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in