Chagan Bhujbal : नागपूरनंतर आज वर्धेतही राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन !

शारदा मातेचा, सरस्वतीचा फोटो लावतात. जिला कधी आम्ही पाहिलं नाही, त्याची पूजा कशाला करायची? असे वादग्रस्त विधान भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केले होते.
BJUM's Agitation against Chagan Bhujbal.
BJUM's Agitation against Chagan Bhujbal.Sarkarnama

वर्धा : भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) वर्धा (Wardha) जिल्हा तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. अशा नेत्यांना सद्बुद्धी मिळो, यासाठी सरस्वती पूजन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष वरूण पाठक यांनी सांगितले.

शाळेमध्ये शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजे. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, शारदा मातेचा, सरस्वतीचा फोटो लावतात. जिला कधी आम्ही पाहिलं नाही, त्याची पूजा कशाला करायची? असे वादग्रस्त विधान भुजबळ यांनी केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे वर्धा येथील राष्ट्रवादी (NCP) कार्यालयासमोर सरस्वती मातेच्या फोटोचे विधिवत पूजन पंडित विशाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) मुर्दाबाद, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

सध्या महाराष्ट्रात नवरात्री उत्सव उत्साहात सुरू आहे. अशाच वेळी असे विधान समोर येणे म्हणजे हिंदूंमध्ये जातीपातीचे तेढ निर्माण करण्याचा कट असल्याचे दिसते. पण जनता यांच्या या कटकारस्थान भुलणार नाही व यांना लवकरच त्यांची जागा दाखवणार, असे वक्यव्य भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांनी म्हटले. यावेळी गौरव गावंडे, कृष्णा जोशी, पृथ्वीराज शिंदे, वैभव श्यामकुवर, प्रिया ओझा, शुभम खंडारे, करण गेलानी, अक्षय बैस्वार, गौरव शर्मा, बादल झामरे, रवी खंडारे, विशाल कुमरे, दिनेश जयस्वाल, सिद्देश फाये, आदित्य खंडारे, रोशन खिरकर उपस्थित होते.

शाळांमध्ये सरस्वती मातेचे छायाचित्र लावण्यावरून माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद वर्धेतही उमटले. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर सरस्वती मातेचे पूजन करून भुजबळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निषेध केला. छगन भुजबळ यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवे वादंग निर्माण झाले आहे. भुजबळांनी केलेल्या या विधानावरून वातावरण तापल्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अशात भारतीय जनता युवा मोर्चाने शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन करीत निषेध केला.

BJUM's Agitation against Chagan Bhujbal.
सरस्वतीची प्रतिमा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते भुजबळ फार्मवर!

काय म्हणाले होते भुजबळ?

शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी उपस्थित केला. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या शाळांतील सरस्वतीचे छायाचित्र कदापि काढले जाणार नाहीत, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सरस्वती ही विद्येची आणि कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत सरस्वतीचा मान आहे. भारतीय संस्कृती, हिंदुत्व मान्य नसलेली व्यक्तीच असे बोलू शकते, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर आज वर्धेत सरस्वती पूजन करण्यात आले.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले. देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी भुजबळ यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com