'आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी'; राऊतांचा राणा दाम्पत्याला निर्वाणीचा इशारा

Sanjay Raut | Shivsena| सरकार आमचे असल्याने आमचे हात बांधलेत, पण शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही
'आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी'; राऊतांचा राणा दाम्पत्याला निर्वाणीचा इशारा
Sanjay Raut

मुंबई : "तुम्ही कोणाच्या पाठबळाने मुंबईत येऊन मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक गप्प बसतील का, तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका, तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा तुम्हालाही घरे आहेत. पण आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.'

Sanjay Raut
राज ठाकरेंना इशारा... तर वारकरी गुन्हे दाखल करतील!

सरकार आमचे असल्याने आमचे हात बांधलेत, पण शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी आम्हाला देऊ नका. शिवसेनेला आव्हान देण्यासाठी, पुरुन उरण्यासाठी भाजपला सात जन्म घ्यावे लागतील, गेल्या दोन दिवसातल्या घटना पाहता अजून तर सुरुवातही झाली नाही. हा फक्त शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही तर जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. राणा यांना मोठं आम्ही करत नाही. कालपर्यंत हिंदूत्वावर हल्ले करणारे हे बंटी आणि बबली आहेत. यांना भाजप किंवा आता नव हिंदूत्ववादी औवैसी आलेय, ते यांना मोठं करत आहेत. पण त्यांचेच हात जळणार आहेत, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याच वेळी त्यांनी 'Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी... जय महाराष्ट्र!!' असे ट्विट करत राणा दाम्पत्याला एक प्रकारे इशारा दिला आहे.

'आम्ही मातोश्रीवर जाणार, रोखू नये, पोलिसांनी आम्हाला रोखू नये. शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे राहिले नाही. मुख्यमंत्री पोलिसांना हाताशी धरुन कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. त्यांनी शिवसैनिकांना (Shivsena) आमच्यावर हल्ला करण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही राणा दाम्पत्याने केला आहे. आम्ही मातोश्रीवर जाणार आणि काही झाली तर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहिल', अशी भुमिका आमदार रवी राणा यांनी घेतली आहे.

अमरावती पोलिसांना हुलकावणी देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. आज सकाळी ९ वाजता ते मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा हट्ट धरला आहे. मात्र आज सकाळपासूनच त्यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक जमले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणा दाम्पत्यांचे खार येथील निवासस्थान व मातोश्री परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Sanjay Raut
शिवसैनिकांनी हल्ला केलेल्या मोहित कंबोज यांच्या पाठीशी आता नितेश राणे!

राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसेनेनं आखली आहे. रात्रीपासूनच शिवसैनिक त्या परिसरात जमले आहेत. राणा दाम्पत्य व मातोश्री जवळ बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. खासदार नवनीत राणांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. तर त्यांनी येऊनच दाखवावं, असं प्रतिआव्हान माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) दिलं आहे.

हिम्मत असेल तर मातोश्री वर येऊन दाखवा, असं खुलं आव्हानच किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्याला दिलं आहे. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचे तुम्हाला कोणी निर्देश दिले, अपक्ष खासदार, दुसऱ्याच्या जीवावर झालेले आमदार तुम्हाला कोणी निर्देश दिले आहे ते सांगा, तुम्ही आमच्या मातोश्रीवर घुसणार आणि बघत बसणार का असा सवालही पेडणेकर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, दिवंगत बाळासाहेब आमचे बाप आहेत आणि मातोश्री आई आहे, तुम्ही येऊनच दाखवा, मग शिवसैनिक काय असतो हे दाखवून देऊ. असा इशाराही पेडणेकरांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.