तर आज फडणवीस मुख्यमंत्री असते; नागपूरच्या मातीवरुन राऊतांनी डिवचलं

Sanjay Raut| Devendra Fadanvis| Ravi Rana| नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावरही संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
तर आज फडणवीस मुख्यमंत्री असते; नागपूरच्या मातीवरुन राऊतांनी डिवचलं
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नागपुरात (Nagpur) आल्याने इथल्या मातीतून त्यांना सद्बुद्धी मिळेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) लगावला होता. यावर संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, फडणवीस यांना ही सद्बुद्धी अडीच वर्षांपूर्वी मिळाली असती तर कदाचित राजकारण वेगळं असतं. पण नागपूरच्या मातीत दुर्दैवाने तुम्हालाच सुबुद्धी आली नाही. अन्यथा तुम्ही आज मुख्यमंत्री असता,' असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आपल्या हिंदुत्ववादी मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची एक वेगळी सद्बुद्धी मिळाली आणि तुमच्यावर ही वेळ आली. दुर्बुद्धी तुम्हाला सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देत आहात. या सद्बुद्धीचं अजीर्ण इतकं झालं तुम्हाला की आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut
लालपरी सेवेत हजर; पण १६ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार?

“बंटी बबली मुंबईत पोहोचले याने आम्हाला काही फरक पडत नाही. कोणाला स्टंट करायचे असतील तर त्यांना ते करु दे, त्यांच्या स्टंटने आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांना शिवसेनेचं मुंबईचं पाणी काय आहे अजून माहिती नाही.स्टंट करण्यासाठी भाजप ला सी ग्रेड नटांची गरज पडत आहे. पण मुंबई पोलीस आणि शिवसैनिक यांना तोंड द्यायला सक्षम आहेत.

शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालिसा पठण, रामनवमी साजरी करणे, हे धार्मिक आणि श्रद्धेचे विषय आहेत. नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. पण अलीकडे भाजपाने ही नौटंकी आणि स्टंट करुन ठेवलं असून त्यातील ही पात्रं आहेत. लोक यांच्या हिंदुत्वाला, नाटकबाजीला गांभीर्यानं घेत नाही, असही संजय राऊयत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.