संजय राऊत म्हणाले, फडणवीस झोपेतही बडबडतात, अन् बेडवरून पडतात…

ज्यांचे १७० झाले, १४५ चा आकडा पार केला, त्यांनी सरकार बनवलं. यालाच संसदीय लोकशाहीचा विजय म्हणतात आणि तो आम्ही मिळवला. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला राज्य करू दिलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
Sanjay Raut on Devendra Fadnavis  News, Sanjay Raut Latest news
Sanjay Raut on Devendra Fadnavis News, Sanjay Raut Latest news Sarkarnama

नागपूर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सोमवारपासून नागपुरात होते. तीन दिवस बैठकांचा धडाका लावून काल रात्री ते मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी ‘सरकारनामा’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर कडाडून टिका केली. फडणविस झोपेत बेडवरून कसे खाली पडतात, हे त्यांनी यावेळी सांगितले. (Sanjay Raut on Devendra Fadnavis News)

..आणि म्हणून शिवसेना कमजोर पडली!

विदर्भात शिवसेना काही नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते, तेव्हा त्यांनी अनेकदा विदर्भाचे दौरे केले. अगदी कस्तुरचंद पार्क भरलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सभेसाठी, उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांच्या सभेसाठी, शिवसेनेच्या कार्यक्रमांसाठी अनेक मोर्चे आम्ही काढलेले आहेत. सर्वात मोठा २७ लाख बेरोजगारांचा मोर्चा आम्ही येथे काढला होता. विदर्भात ठिकठिकाणी आम्ही कामे केलेली आहेत. पण त्या काळात भाजपसोबत युतीमध्ये असल्यामुळे मोठा वाटा तेव्हा भाजपकडे गेला. त्यामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना कमजोर पडली, ते आम्हाला आता जाणवत आहे. भाजपपासून दूर झाल्यामुळे त्या संघटनात्मक त्रुटी आम्हाला आत्ता जाणवायला लागल्या आहेत. आता महाराष्ट्रात सरकार आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या अपेक्षा आहेत, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ठरवलं की, पक्षाच्या सर्व खासदारांनी विदर्भ मराठवाड्यात जावं, शिवसंपर्क अभियान करावं, लोकांना भेटावं चर्चा करावी. त्यानुसार आमचे सर्व खासदार विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत आणि मी नागपुरात आलो असल्याचे खासदार राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

नागपूर महानगरपालिकेवर फगवा फडकवावा..

आम्हाला तर असे वाटते की नागपूर महानगरपालिकेवर भगवा फडकवावा आणि त्यासाठी आम्ही तयारी सुरू केलेली आहे. महापालिकेच्या सर्व जागा लढवाव्या आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक निवडून आणावे, हे आमचं स्वप्न आहे. आम्ही तयारी सुरू केली आहे. नवीन नवीन कार्यकर्ते, नवनवीन लोकं येऊन भेटत आहेत. पक्षाचं काम करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे येऊन भेटत आहेत. शिवसेना हा असा पक्ष आहे की, शिवसेनेचं नाव काढलं की लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि हा रोमांच भविष्यात विदर्भात दिसणार आहे, असे राऊत म्हणाले.

फडणवीसांनी स्वप्नरंजनातून बाहेर पडायला हवं..

देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात की, सरकार पडणार.. पडणार… अन् बेडवरून खाली पडतात, अशी भाजपची अवस्था आहे. त्यांना या स्वप्नरंजनातून बाहेर पडायला हवं. सरकारला अडीच वर्ष झालेली आहेत. सरकार बनल्याच्या पहिल्या दिवसापासून उद्या पडणार, परवा पडणार, असे म्हणत अनेक तारखा देत आहेत. अडीच वर्षांचा कालावधी निघून गेला, आणखी अडीच वर्षांचा कालावधी निघून जाणार. आमचे सरकार ५ वर्ष पूर्ण करणार. निवडणुकीत आपण पाहू की, कोण पडणार? ते लोकं ठरवतील.

Sanjay Raut on Devendra Fadnavis  News, Sanjay Raut Latest news
संजय राऊत भडकले; म्हणाले, राजकीय सूडबुद्धीच्या कारवाईचं उत्तर द्यावं लागेल…

या क्षणी १७०चं बहुमत महाविकास आघाडीकडे आहे, हे भारतीय जनता पक्षानं स्वीकारायला हवं. भाजप हा नक्कीच मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. १०५ आमदार त्यांचे आहेत. आहेत त्यांचे १०५ पण १७० होऊ शकले नाहीत ना.. मग ज्यांचे १७० झाले, १४५ चा आकडा पार केला, त्यांनी सरकार बनवलं. यालाच संसदीय लोकशाहीचा विजय म्हणतात आणि तो आम्ही मिळवला. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला राज्य करू दिलं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा प्रकारे गैरवापर करून, महाराष्ट्र सरकारला बदनाम करून, मंत्र्यांना खोट्या प्रकरणांमध्ये तुरुंगात टाकून ते काय मिळवणार आहेत, ते आपल्याच राज्याची बदनामी करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in