'' काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी आणि खाकी पँट घालून सभागृहात येतील...!''

Sanjay Raut On Eknath Shinde : सत्तेमुळेच शिंदे गटात झुंडशाही आणि मस्तवालपणा...
Sanjay Raut , Eknath Shinde
Sanjay Raut , Eknath ShindeSarkarnama

Sanjay Raut On Eknath Shinde and devendra fadnavis Rss Office visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील रेशीमबागमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली. या संघ कार्यालयाच्या भेटीवरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांना संघ कार्यालयाच्या भेटीवरुन चिमटा काढला आहे.

खासदार संजय राऊतांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, 'संघ विचाराचा कीडा त्यांच्या कानात पहिल्यापासून वळवळत आहे, पण हे चुकीचं नाही. आरएसएस ही एक हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री काही दिवसांनी काळी टोपी आणि खाकी पँट घालूनही सभागृहात येतील. त्याचंही आम्ही स्वागत करु. आरएसएसवर आम्ही कधीही टीका केली नाही. पण, आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की,त्यांनी पक्षांतर केलं ठीक आहे पण एवढ्या लवकर ते रक्तांतर करतील असं वाटलं नव्हतं असा टोलाही संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

गद्दार हे घुसखोरच आहेत. त्यांना स्वत:चं अस्तिव नाही. ते कुठेही घुसत असतात. हातात सत्ता आहे. झुंडशाही आणि मस्तवालपणा सत्तेमुळेच आला आहे. पण सत्तेशिवाय समोरासमोर या, मग दाखवतो. काल शिवसैनिकांनी दाखवलं ना. काल शिवसैनिक गेले. त्यांनी दाखवून दिलं. गद्दारांची एक पद्धत आहेत. गद्दार कुठेही घुसतात असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut , Eknath Shinde
Ajit Pawar : अब्दुल सत्तारांच्या उत्तरावर अजितदादांचे प्रश्नचिन्ह, म्हणाले..

मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयात घुसखोरांची टोळी घुसते. ताबा घेतात. त्यानंतर पालिका प्रशासन मुंबई महापालिकेतील सर्व पक्षाच्या कार्यालयाला सील करण्यात आलं आहे. कोणत्या कायद्याने सील लावलं गेलं? नोटीस दिली का? ही मनमानी आहे.

याला कायद्याचं राज्य म्हणत नाही. या राज्यात लोकशाही राहिली आहे का? तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल. तर, ठोकशाहीच्या राज्यात शिवसेनेचं प्रगस्तीपुस्तक चांगल्या मार्काचं आहे. ठोकशाहीत शिवसेनेची कोणी स्पर्धा करू नये. मुंबई पालिकेतील कार्यालय शिवसेनेचंच राहणार आहे असं देखील राऊतांनी यावेळी ठणकावलं.

Sanjay Raut , Eknath Shinde
Ajit Pawar On Bawankule: "करेक्ट कार्यक्रम करू," असं बावनकुळे म्हटल्यापासून मला झोप येत नाही ; अजित पवारांचा टोमणा

शिवसेना भवनावर ताबा घ्यायला त्यांचे बाप आले पाहिजे. त्यांचा एक बाप असेल तर येईल. आणि त्यांच्या बापाला देखील ते शक्य नाही. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? ही बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. बाळासाहेबानी ही वास्तू उभी केली आहे. ती आमची आहे. शिवसेनेच्या नावानेच ती राहील असेही अशा शब्दांत राऊतांनी शिंदेगटाला फटकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in