काल रात्री आदित्य ठाकरेंसोबत असलेल्या संजय राठोडांचेही पलायन...

काल रात्री आदित्य ठाकरेंच्या गाडीमध्ये ते सोबत होते. कुठल्याही परिस्थितीत संजय राठोड (Sanjay Rathod) मातोश्री सोडणार नाही, अशी परिस्थिती काही तासांपूर्वीपर्यंत होती.
Sanjay Rathod News in Marathi, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis
Sanjay Rathod News in Marathi, Eknath Shinde News, Maharashtra Political CrisisSarkarnama

संजय राठोड

यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आजवरचे सर्वात मोठे बंड पुकारले आहे. गुजरातेतील सुरतमधून शिंदे आणि त्यांचे आमदार आज पहाटेच आसाममधील गुवाहाटीत गेले. काल सकाळी ११ आमदारांपासून सुरू झालेले त्यांचे बंड आज ४६ आमदारांपर्यंत पोहोचले आहे. (Sanjay Rathod News in Marathi)

महाराष्ट्रातील या महानाट्याला परवा रात्रीपासून नाट्यमय घडामोडी होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निष्ठावान असलेले नेतेही एक-एक करून शिंदेंना जाऊन भेटले आहेत. थेट पक्षश्रेष्ठींवरच सर्वांची नाराजी दिसत आहे. त्यातल्या त्यात शिंदे (Eknath Shinde) यांच्या क्षेत्रात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि त्यांच्या चमूचा हस्तक्षेप शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांना खटकला असल्याचे सांगण्यात येते. सध्यापर्यंत ४६ असलेली बंडखोरांची संख्या वाढणार असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. (Maharashtra Political Crisis news)

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्‍वासू यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे आमदार संजय राठोडही आता एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हणजे गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. कालपासून एका पाठोपाठ धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरेंना हा पुन्हा एक मोठा धक्का आहे. कारण काल रात्रीपर्यंत संजय राठोड त्यांच्यासोबत होते. काल रात्री आदित्य ठाकरेंच्या गाडीमध्ये ते सोबत होते. कुठल्याही परिस्थितीत संजय राठोड मातोश्री सोडणार नाही, अशी परिस्थिती काही तासांपूर्वीपर्यंत होती. पण आज सकाळी ते गुवाहाटीकडे रवाना झाल्यामुळे आता कोण आपला आणि कोण बंडखोर, हे ओळखणे अवघड होऊन बसले आहे.

Sanjay Rathod News in Marathi, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे समर्थकांनी असा दिला `चकवा`

ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री राहून चुकलेले संजय राठोड यांना एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही काळ त्यांना अज्ञातवासात काढावा लागला होता. तेव्हा मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आपल्यासोबत राहिले नाही, ही खंत संजय राठोड यांना होतीच. त्यांनी कम बॅक करण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले होते. पण त्यात ठाकरेंनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना यश आले नव्हते. एक प्रकारे उद्धव ठाकरेंवर त्यांची नाराजी होतीच. आता गुवाहाटीची वाट धरून राठोडांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com