Shivsena : संजय राठोड यांचे पाठीराखे, बंजारा काशीचे महंत लागले उद्धव ठाकरेंच्या गळाला !

महंत सुनील महाराज यांच्या हातात शिवबंधन बांधण्याची रणनीती आखत शिवसेनेने (Shivsena) संजय राठोड यांना आता घेरण्यास सुरुवात केली आहे.
Sanjay Rathod, Mahant Sunil Maharaj and Uddhav Thackeray.
Sanjay Rathod, Mahant Sunil Maharaj and Uddhav Thackeray.Sarkarnama

वाशीम : बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या एक-एकाचा हिशोब चुकता करण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचा नंबर लागला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राठोडांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथून महंत सुनील महाराज त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. पण आता या महंतांनी शिवबंधन बांधण्याची तयारी केली आहे.

महंत सुनील महाराज यांच्या हातात शिवबंधन बांधण्याची रणनीती आखत शिवसेनेने (Shivsena) संजय राठोड यांना आता घेरण्यास सुरुवात केली आहे. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते. येथील महंतांचा बंजारा समाजावर मोठा प्रभाव आहे. महाविकास आघाडी सरकारमधे (Mahavikas Aghadi Government) संजय राठोड (Sanjay Rathod) यांना एका प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी संजय राठोड यांची पाठराखण करण्यात पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज आघाडीवर होते. याच सुनील महाराजांच्या हातात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवबंधन बांधण्याचे ठरविले आहे.

या संदर्भात सुनील महाराज मुंबई येथे जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात खुद्द महंत सुनील महाराज यांनी सांगितले की, संजय राठोड यांना शिंदे सरकार मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांना मुंबईला भेटायला गेलो असता त्यांनी ४ तास बसवून ठेवले. चर्चेसाठी वेळ दिला नाही. त्यामुळे बंजारा समाजाच्या हितासाठी आणि पोहरादेवी संस्थान विकासासाठी मी हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे यानंतर संजय राठोड आणि माझा कोणताच संबंध राहणार नसल्याचे यावेळी सुनील महाराज यांनी सांगितले.

Sanjay Rathod, Mahant Sunil Maharaj and Uddhav Thackeray.
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचे आक्रमक भाषण

सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधल्यानंतर बंजारा समाज किती प्रमाणात त्यांच्या सोबत जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण संजय राठोड यांचा दारव्हा मतदारसंघ बंजारा बहुल आहे. तसेच हा मतदारसंघ पोहरादेवीलगतच आहे. महंत सुनील महाराज याआधी एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य होते. तसेच ते एकदा अपक्ष पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत.

यासंदर्भात महंत सुनील महाराज यांच्याशी संपर्क केला असता ते काल रात्री नागपूर येथून मुंबईसाठी रवाना झाले. तर आज सकाळी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यांचा शिवसेना प्रवेश मातोश्रीवर किंवा दसरा मेळाव्यात होऊ शकेल, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com