Sandeep Joshi : खेळाडू थोडे गरमच असतात, ‘त्या’ घटनेबाबत माजी महापौरांचे स्पष्टीकरण...

BJP Leader : भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांनाच मारहाण केली.
Sandeep Joshi
Sandeep JoshiSarkarnama

MP Sports Festival News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून नागपुरात (Nagpur) सध्या खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. यादरम्यान भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांनाच मारहाण केली. यासंदर्भात या महोत्सवाचे आयोजक माजी महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांना विचारले असता, ‘खेळाडू थोडे गरमच असतात...’, असे ते म्हणाले.

याचा अर्थ झालेल्या घटनेचे मी समर्थन करतोय असे नाही. तर खेळताना एक स्पिरिट निर्माण होते. त्यामध्ये भावनेच्या भरात खेळाडू कधी कधी आक्रमक होतात. असाच काहीसा प्रकार परवा खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान घडला आणि हाणामारीची घटना घडली. त्यानंतर खेळाडू आणि पंचांना सावरण्याचे काम आम्ही आयोजक या नात्याने केले.

खेळाच्या दरम्यान अशा घटना घडू नये, याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतो. पण कधी ना कधी, कुठे ना कुठे एखादी अशी घटना घडते, असेही संदीप जोशी म्हणाले. मुन्ना यादव यांचा मुलगा करण याने पंचांना मारहाण केली आणि मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

आता मारहाण करणाऱ्यावर कारवाई होईल का, असे विचारले असता, या प्रकाराची पोलिसांत तक्रार झाली की नाही, हे मला माहिती नाही. पण आमच्या स्तरावर चौकशी करून त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांना देणार आहोत. मारहाणीचा प्रकार अजिबात योग्य नाही आणि नितीन गडकरींनी महोत्सव आयोजित केला आणि भाजप नेत्याने त्यामध्ये गडबड केली, या दृष्टीने या घटनेकडे बघणे योग्य नाही, असे जोशी यांनी सांगितले.

Sandeep Joshi
खासदार क्रीडा महोत्सवासाठी तेंडुलकर आणि गडकरींनी केले संदीप जोशींचे कौतुक !

हा देशातला सर्वात मोठा इव्हेट आहे. यामध्ये केवळ १३ दिवसांत ६२ क्रीडांगणांवर ५५ खेळांच्या स्पर्धा होत आहे. इतक्या मोठ्या आयोजनामध्ये कुठेतरी लहान मोठ्या घटना घडतील, याचा अंदाज असतोच. काही घटना मिडियापर्यंत पोहोचतात, काही पोहोचत नाहीत. त्यातील ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली घटना आहे. पण या घटनेला वेगळा ॲंगल देऊ नये, असे आयोजक म्हणून आमचा आग्रह असणार आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com