
Nagpur Crime News : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान यांचा खून प्रकरणी अमित शाहू तपासात पूर्णपणे सहकार्य करीत नाहीये. सनाचा खून करून त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट नेमकी कशी लावली, हे शोधणे अत्यंत आवश्यक असल्याने त्याची ‘नार्को टेस्ट’ करणे आवश्यक आहे. त्याची परवानगी देण्यात यावी, असा विनंती अर्ज पोलिसांनी न्यायालयापुढे सादर केला आहे. (How exactly did he dispose of her body?)
दाखल केलेल्या अर्जावर काल (ता. २८) त्यावर एक सुनावणी झाली, अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. पण ‘नार्को टेस्ट’चा आदेश अद्याप देण्यात आलेला नाही, अशी माहिती आहे. सना खान यांचा मृतदेह अद्यापही पोलिसांना सापडला नाही.
दरम्यान अमित ऊर्फ पप्पू शाहू हा पोलिसांची सातत्याने दिशाभूल करीत असल्याने त्याच्याकडून खरी माहिती काढण्यासाठी नागपूर (Nagpur) पोलिसांनी त्याची ‘नार्को टेस्ट’ करण्याच्या परवानगीसाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयासह जबलपूर न्यायालयातही (Court) अर्ज केला आहे.
अमित ऊर्फ पप्पू शाहू याने तीन ऑगस्टला सना खान यांचा खून करून, त्यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती ११ तारखेला त्याच्यासह मित्र राजेश सिंग यांना अटक केल्यावर पोलिसांना दिली. दरम्यान त्यानुसार पोलिसांनी विविध पथके लावून नर्मदा नदीसह हिरण नदीच्या पात्राचा जवळपास साडेतीन ते चार किलोमीटरपर्यंत आपत्ती निवारण पथकांच्या माध्यमातून शोध घेतला.
त्यानंतर एक संशयित मृतदेह सापडला. तो दिशाभूल करत असल्याने पोलिसांनी इतर साथीदार धमेंद्र यादव, धमेंद्रचे वडील रब्बू चाचा ऊर्फ रविशंकर यादव व कमलेश पटेल यांना अटक केली. सना यांची बॅग आणि मोबाईल ताब्यात घेतला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी रविवारी (ता. २७) पोलिसांची तीन पथके जबलपूरला रवाना झाली.
सोमवारपासून (ता. २८) ही पथके हिरण व नर्मदा नदीकाठावरील रहिवाशांच्या मदतीने मृतदेहाचा घेत घेणार आहेत. हिरण नदीकाठावर पोलिसांना सना यांची बॅग सापडली. त्यात सना यांचे कपडे होते.
दागिने, मोबाईलसह अन्य वस्तू अद्यापही पोलिसांना (Police) आढळलेल्या नाहीत. मृतदेहासह अन्य साहित्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, सना यांचा मृतदेह न मिळणे हा या खून प्रकरणाच्या तपासातील सगळ्यात मोठा अडथळा आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.