Sana Khan Murder Case : महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती, पप्पूच्या जबानीवर उपायुक्तांचा शोध !

Nagpur Police : पोलिसांना महत्त्वाचा पुरावा गवसला असल्याची माहिती मिळाली आहे.
Sana Khan
Sana KhanSarkarnama

Nagpur Crime Case : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान यांच्या मृत्यूचे गूढ वाढत असताना पोलिसांच्या तपासाला यश येऊ लागले आहे. पोलिस उपायुक्‍तांच्या तपासणीमध्ये पोलिसांना महत्त्वाचा पुरावा गवसला असल्याची माहिती मिळाली आहे. (The police investigation has begun to succeed)

सना खान यांच्या खुनानंतर पप्पू ऊर्फ अमित शाहूला पोलिसांनी जबलपूरमधून अटक केली. त्याने खून करून सना यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याचे सांगितले. तपास करूनही पोलिसांना तिचा मृतदेह सापडला नाही. तरीही पोलिस पथके जबलपूरला मृतदेहाचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल मदने आणि गुन्हे शाखेचे मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वात फॉरेन्सिक विभागाचे पथकही जबलपूरला गेले.

फॉरेन्सिक विभागाच्या टिमने पप्पूने वापरलेल्या कारमधील रक्ताचे नमुने आणि इतर गोष्टी तपासल्या. तेव्हा एकाने घटनेच्या दिवशी सना खान यांचा मृतदेह बघितल्याची माहिती दिल्याचे समोर आले. त्यामुळे हा पुरावा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

शंभर किलोमीटर तपासणी..

पोलिसांनी आतापर्यंत मृतदेहाच्या शोधात आजूबाजूच्या १०० किलोमीटरपर्यंत गावागावांत तपासणी केली आहे. विशेष म्हणजे, सना खान यांच्या मृतदेह पाण्यात फेकल्यानंतर २.७५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्या दिवशी १२ ते १५ फूट उंच पाण्याची पातळी होती. त्यामुळे मृतदेह कुठे असेल, याबाबत सध्यातरी काही सांगता येणे शक्य नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Sana Khan
Vijay Wadettiwar On Jalana Protest | "मराठा समाजाची माफी मागा" | Nagpur |

दोन दिवसांपूर्वी नागपूर (Nagpur) शहर पोलिस दलातील दोन पोलिस उपायुक्त जबलपूरला गेले होते. या पथकाने सना यांची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली. तेथे असलेल्या रक्ताचे नमुने घेतले. सना यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी २७ ऑगस्टला पोलिसांचे (Police) तीन पथके जबलपूरला गेली. त्यांनाही मृतदेह आढळला नाही.

दरम्यान पोलिस उपायुक्तांनीही जबलपूरमध्ये आरोपी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासह साथीदारांनी सांगितलेल्या माहितीची उलटतपासणी केली. मात्र, त्यातूनही काही गवसले नाही. मानकापूर पोलिसांनी हत्याकांडाचा सूत्रधार व कुख्यात गुंड अमित ऊर्फ पप्पू शाहू, त्याचा मित्र राजेश सिंग, धमेंद्र यादव, धमेंद्रचे वडील रब्बू चाचा ऊर्फ रविशंकर यादव व कमलेश पटेल या पाच जणांना अटक केली.

Sana Khan
Vijay Wadettiwar Nagpur News | "पवारांचं 'ते' पाऊल यशस्वी होणार" | Sharad Pawar | Ajit Pawar

त्या मृतदेहाचे रहस्यही उलगडणार..

पोलिसांना जबलपूरच्या एका गावातील विहिरीत एक मृतदेह आढळला होता. तो मृतदेह सना यांचा आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र, आईसह नातेवाइकांनी तो मृतदेह सना यांचा नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे त्या मृतदेहाची डीएनए तपासणी करण्याचे ठरले. त्यानुसार आईचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल लवकरच येणार असून त्यानंतर तो मृतदेह नेमका कुणाचा हे स्पष्ट होईल.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in