
Nagpur Crime News : सना खानच्या मृत्यूचा कबुली जबाब दिल्यावरही पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह गवसलेला नाही. त्यामुळे तो मिळावा यासाठी पोलिसांचे कसोशीने प्रयत्न सुरू असून आता पुन्हा मृतदेह शोधण्यासाठी तीन पथके जबलपूरला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. पोलिस नदीपासून ५० किलोमीटर परिसरातील प्रत्येक गावामध्ये मृतदेहाबाबतची शोधमोहीम राबविणार आहे. (A search operation will be conducted in each village)
जबलपूरला सना खानची पप्पू ऊर्फ अमित शाहू याने हत्या केली होती. दरम्यान तिचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिल्याची माहिती पप्पूने दिली होती. तेव्हापासून सातत्याने पोलिस मृतदेहाचा शोध घेत आहे. यादरम्यान ३०० किलोमीटर दूर एका विहिरीत संशयित मृतदेहही ताब्यात घेतला. विशेष म्हणजे, पोलिसांना सहआरोपी धर्मेंद्र सिंग याने दिलेल्या माहितीनुसार मृतदेह नदीत फेकून, बॅग तिथेच ठेवल्याचे सांगितले.
नागपूर (Nagpur) पोलिसांनी बॅग आणि एक मोबाईलही जप्त केला. दुसरीकडे गेल्या तीन आठवड्यापासून पोलिसांकडून हिरण आणि नर्मदा या दोन नद्यांच्या आसपासच्या भागात शोध घेणे, अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवर कारवाई करण्याचे काम सुरू केले.
मात्र, पोलिसांना सना खानचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा तीन नवी पथके जबलपूरला (Jabalpur) मृतदेह शोधण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. हिरण आणि नर्मदा नदीजवळील ५० किलोमीटर अंतरावरील गावांमधील नागरिकांना त्याबाबत विचारणा करण्यात येणार आहे.
नागरिकांना करणार विचारपूस..
पोलिसांना (Police) नदीजवळ बॅग आढळून आली. त्यात सना खानचे कपडे होते. त्यामुळे नदी नजीकच्या गावातील नागरिकांना काही संशयित वस्तू आढळली का? याबाबत विचारणा करण्यात येणार आहे. त्यातून सना खानच्या मृतदेहाबाबत काही माहिती मिळेल, असा विश्वास डीसीपी राहुल मदने यांनी व्यक्त केला.
सगळ्या शक्यता तपासून बघितल्या जात आहेत. सीडीआरचे ॲनालिसीस, लोकेशन आणि आरोपींचा कबुली जबाब या सर्व बाबी तपासून प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला जाईल. अजूनही आमच्या टीम आरोपींनी कबुली जवाबात सांगितलेल्या नदीच्या परिसरात मृतदेहाचा शोध घेत आहेत, असेही डीसीपी मदने यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.