
Nagpur Murder Case News: बहुचर्चित सना खान हत्या प्रकरणात आता वेगवेगळे खुलासे समोर येऊ लागले आहेत. पोलिसांना सना खानचा मोबाईल फोन अजून सापडलेला नाही. त्यामध्ये काही व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तो मोबाईल सापडल्यास यात मोठमोठे लोक अडकण्याची शक्यता आहे. (Big people are likely to be trapped in it)
आरोपी अमित ऊर्फ पप्पू आणि सना ऊर्फ हिना हनी ट्रॅप रॅकेट चालवत होते. त्याने व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून कोट्यवधींची रक्कम उकळली असून, त्यांच्या या हनी ट्रॅपमध्ये शेकडो पांढरपेशे अडकले असल्याची चर्चा आहे. नागपूर (Nagpur) पोलिसांनी मध्य प्रदेशातील नरसिंहपूरचे विद्यमान आमदार संजय शर्मा यांना नोटीस बजावली असून बुधवारी चौकशीसाठी बोलवले असल्याची माहिती आहे.
सनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर आरोपी पप्पू तिचा हनी ट्रॅपसाठी उपयोग करीत होता. ठार मारण्याची धमकी देऊन तो अश्लील कृत्य करायला लावत होता. गुन्हा नोंद झाल्याने राजकीय (Political) वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. सनाशी संबंधित व्हिडिओ बाहेर आले तर अनेक जण अडकतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी पप्पू शाहू, त्याचा मित्र राजेश सिंह, नोकर जितेंद्र गौड आणि धर्मेंद्र यादव यांना आधीच अटक केली आहे.
हनी ट्रॅपच्या माध्यमातून पप्पूने कोट्यवधींची रक्कम जमविली होती. ती संपूर्ण रक्कम पप्पू एकटाच हडपण्याच्या बेतात होता. याच रकमेवरून भांडण झाले असावे आणि यातच सनाला जीव गमवावा लागला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेनंतर पप्पूला ज्याने आश्रय दिला तसेच पप्पू ज्यांच्या संपर्कात आला अशा लोकांना चौकशीसाठी बोलाविण्यात येत आहे.
पोलिसांनी (Police) या प्रकरणाशी संबंधित कमलेश पटेल आणि रविशंकर यादव या दोघांना जबलपूरहून अटक केली आहे. सखोल चौकशीनंतर आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांना अजूनही सनाचा मोबाईल मिळालेला नाही. पप्पूच्या साथीदाराकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले. ते कुणाचे आहेत, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. या मोबाईलमध्ये बऱ्याच व्हिडिओ क्लिप्स असल्याची माहिती आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.