RTM Nagpur University: मविआ लढणार सिनेट पदवीधर निवडणूक, ११ उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प !

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Senate Election: सिनेटच्या पदवीधर प्रवर्गासाठी १९ मार्चला मतदान होणार आहे.
RTM Nagpur University
RTM Nagpur UniversitySarkarnama

Nagpur Senate Election : महाविकास आघाडीने पदवीधरसह शिक्षक मतदारसंघाचा गड काबीज केल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर प्रवर्गातील जागा एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून महाविकास आघाडीने दहा जागांसाठी अकरा उमेदवारांची घोषणा केली.

निवड केलेल्या उमेदवारांमध्ये तिन्ही पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आल्याची माहिती डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिनेटच्या पदवीधर प्रवर्गासाठी १९ मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी विविध संघटनांतर्फे दहा जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अभाविप, परिवर्तन पॅनल, युवा ग्रॅज्युएट फोरम, शिक्षक भारती आदींचा समावेश आहे.

यंदा निवडणुकांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक वेळी संघटनशक्तीच्या बळावर अभाविपने सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहे. मात्र, गेल्या वेळी परिवर्तन पॅनलने नव्याने निवडणुका लढवीत, दोन जागांवर वर्चस्व मिळविले होते. यावेळी थोडी परिस्थिती वेगळी आहे. पदवीधर मतदारसंघात कॉँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी आणि शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले यांच्या विजयामुळे विद्यापीठाच्या पदवीधर प्रवर्गातही यश मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.

त्यातून पाच खुला प्रवर्ग आणि पाच राखीव गट अशा एकूण दहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यावेळी ॲड. अभिजित वंजारी यांनी दहाही जागांवर विजय मिळविण्याचा विश्‍वास व्यक्त केला. आमदार सुधाकर अडबाले, गिरीश पांडव, सलील देशमुख, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विशाल बरबटे, राजेंद्र हरणे, हर्षल काकडे, माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम, शैलेंद्र तिवारी यांच्यासह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RTM Nagpur University
MVA News : एकत्र लढलो तर २००, नाहीतर १५० जागा मिळतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा

सिनेटच्या पदवीधर निवडणुकीविरुद्ध प्रशांत डेकाटे, शीलवंत मेश्राम व अंकित राऊत यांनी याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र (Maharashtra) सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ६२(२) अनुसार विद्यापीठ प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया कार्यकाळ संपण्याच्या तीन महिन्यांपूर्वी सुरू करणे व ३० नोव्हेंबरपर्यंत संपविणे आवश्यक आहे. त्यानुसार पदवीधर मतदार संघाच्या सिनेट निवडणुकीची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू व्हायला पाहिजे होती.

विद्यापीठाने (University) या निवडणुकीचा कार्यक्रम २० ऑक्टोबर २०२२ रोजी जारी केला व ३० नोव्हेंबर रोजी निवडणूक (Election) ठेवली. यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे विद्यापीठाला निवडणूक रद्द करावी लागली होती. त्यानंतर निवडणूक विभागाने नव्याने कार्यक्रम जाहीर केला. यानुसार आता पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरण्यासह संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. सिनेटमध्ये ७४ सदस्य आहेत.

RTM Nagpur University
Eknath Shinde Government : शिंदे सरकारला दणका; महाविकास आघाडी सरकारच्या 'त्या' कामांचा मार्ग मोकळा

प्राचार्य गटातून १०, व्यवस्थापन गटातून ६, विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष व सचिव असे २, अध्यापक गटातून १०, विद्यापीठ अध्यापक गटातून ३, नोंदणीकृत पदवीधर गटातून १० असे एकूण ४१ सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठात येतात. उर्वरित ३३ सदस्य नामनिर्देशित व पदसिद्ध सदस्य आहेत. या ४१ सदस्यांपैकी १० नोंदणीकृत पदवीधर हे समाजातील मोठ्या गटाचे प्रतिनिधित्व करतात व यांची निवडणूक १९ मार्चला होत आहे. निकाल २१ मार्चला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com