मित्राच्या मदतीला धावून आले रोहित पवार ; म्हणाले, आदित्य ठाकरेंना सहानुभूती मिळेल..

आघाडी सरकार घालवण्यासाठी, आमदारांना फोडण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लोकांना देखील याची जाणीव आहे. (Mla Rohit Pawar)
Mla Rohit Pawar-Aditya Thackeray News Akola
Mla Rohit Pawar-Aditya Thackeray News AkolaSarkarnama

अकोला : मी युवावर्गाला आजही म्हणतोय, त्यांनी पुढे यायला पाहिजे, चांगल्या भविष्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा युवावर्गाला संधी दिली पाहिजे. पक्षाची धुरा कुणी कुणाला देत नसतो त्यासाठी काम करावे लागते. वरिष्ठांच्या विश्वासाने ती मिळवावी लागते, अशा शब्दात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तरुणांना साद घातली.

शिवसेनेच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे, तो पैशाच्या जोरावर झाला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना नक्कीच सहानुभूती मिळणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. (Akola) अकोला येथील मूर्तिजापूरात त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

रोहित पवार हे एका दहीहंडी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले, मनीष सिसोदिया यांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे, त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे अशा चांगल्या व्यक्तीवर सुडातून कारवाई होत असेल तर कारवाईचा विरोध झालाच पाहिजे. माझा मनीष सिसोदिया यांना पाठींबा आहे.

कोणत्याही बोटीला एक क्षमता असते, त्या बोटीची क्षमता संपली की त्या पक्षातील नेत्यांना निर्णय घ्यावा लागेल, असा टोलाही पवार यांनी भाजपला लगावला. तर आमच्या तीन चाकाच्या रिक्षाला सामान्य माणूस मानतो असा चिमटा देखील रोहित पवार यांनी काढला.

Mla Rohit Pawar-Aditya Thackeray News Akola
Shirsat : सावे मागून आले अन् मंत्री झाले, राजकारणात सिनिअरिटी काही राहीलीच नाही..

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष उडालेला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरात फिरत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्यासाठी, आमदारांना फोडण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लोकांना देखील याची जाणीव आहे, त्यामुळेच आदित्य ठाकरे यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद आणि सहानुभूती मिळत असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com