
Nagpur Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत पत्रकार परिषदेला येत आहेत. यावेळी ‘बोलून आपण मोकळं व्हायचं आणि निघून जायचं’, असं शिंदे म्हणत आहेत आणि अजित पवार 'हो..., Yes' म्हणत त्यांना प्रतिसाद देत आहेत. (They are not serious about the people's issues including the issue of reservation)
मुख्यमंत्री शिंदेंच्या या व्हिडिओवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी शिंदेंचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीसाठी आज (ता. १३) नागपुरात दाखल झाल्यानंतर रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचं असं बोलणं म्हणजे ते आरक्षणाच्या विषयासह जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत. राजकारणात केवळ पदे मिळवण्यासाठीच ते गंभीर आहेत.
येथे नतमस्तक झालो..
विदर्भातील (Vidarbha) जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांवर विश्वास ठेवतात, त्या सर्वांच्या भेटी आज नागपुरात (Nagpur) घेणार आहे आणि पुढील महिन्यात तीन आणि चार तारखेला प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. कारण देशात सद्यःस्थितीत संविधान विरोधी वातावरण आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून संविधान बदलणाऱ्या विचारांचा पराभव करण्यासाठी येथे नतमस्तक झालो असल्याचे पवार दीक्षाभूमीवर बोलताना म्हणाले.
..तर आम्ही सरकारसोबत राहू !
आज लोकसंख्येचं प्रमाण बघितलं तर केंद्राने जीआर काढून ईडब्ल्यूएस कोटा आणला. सरकारला मराठा, मुस्लिम आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवायला पाहिजे. पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष, अधिवेशनात हा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. त्यावेळी गरज पडल्यास आम्ही सगळे सरकारसोबत राहू. यात राजकारण न करता हा प्रश्न सोडवला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
ट्रिपल इंजिन ‘त्या’ मोठ्या इंजिनसमोर चालत नाही...
भाजपचे काही कार्यकर्ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते न्यायालयात गेले आहेत. आरक्षणाच्या संदर्भात भाजप नेहमी दुटप्पी भूमिका घेते. राज्यात धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. केंद्राने त्याला विरोध केला.
भाजप सुरुवातीपासून आरक्षणाच्या विरोधात असल्याचे पवार यांनी सांगितले. आरक्षण देण्याची भाजप नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नाही. त्यांच्या तीन इंजिन सरकारचे विचार केंद्रातील मोठ्या इंजिन समोर चालतात का, असा सवालही त्यांनी केला.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.