मनसेला रोखण्यासाठी कॉंग्रेसने उचलले मोठे पाऊल....

bharat jodo yatra मनसे नेते संदिप देशपांडे यांनी कॉंग्रेस ला इशारा दिला होता.
bharat jodo yatra
bharat jodo yatra

Bharat Jodo Yatra नागपूर : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून मनसेने त्यांची शेगाव मधील सभा उधळून देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज यात्रेमध्ये दंगल नियंत्रण पथकाचे (RCP) 100 कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

शेगाव येथील सभेच्या पार्श्वभूमीवर दंगा नियंत्रण पथक पथकाचे शंभर कमांडो यात्रेदरम्यान आणि सभेच्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेले आहेत. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल केलेलं वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मनसे आणि शिवसेनेने या यात्रेवर बंदी घालावी,अशी मागणी केली तर मनसेने ही सभा उधळून लावू, असा इशारा दिला आणि याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणूनच दंगा नियंत्रण पथकातील शंभर कमांडो यात्रेमध्ये आणि सभेच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

bharat jodo yatra
'मनसेने कितीही विरोध केला तरीही ते भारत जोडो यात्रा रोखू शकत नाही'

आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश केला. तेव्हापासून हे कमांडो यात्रेत सहभागी झाले आहेत. बाळापूर ते शेगाव मार्गातील वडगाव येथे रिंगण सोहळा सुरू आला आहे. या स्थळापर्यंत ही मनसेने कार्यकर्ते पोहोचू नये, याची पूर्ण व्यवस्था पोलिसांनी केलेली आहे.

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी कॉंग्रेस ला इशारा दिला होता. “राज्यभरातून मनसैनिक शेगावला पोहोचतील. सावकरांचा अपमान करणाऱ्यांना समजेल अशा भाषेत त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत. पोलिसांनी त्यांचं काम करावं आणि आम्ही आमचं काम करु,” असं संदीप देशपांडे म्हणाले होते. “काँग्रेसने वल्गना करण्याची गरज नाही. काँग्रेसची काय ताकद आहे हे आम्हाला माहित आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा इतिहास त्यांना माहिती नाही,” असंही ते म्हणाले आहेत. त्यांना धडा शिकवण्याची गरज असून आम्ही तो शिकवणार असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com