Devendra Fadnavis News : फडणवीसांच्या 'ओएसडी'वर वर्धा लोकसभेची जबाबदारी!

Devendra Fadnavis News : वर्धा वानखेडेंची सासुरवाडी..
Sumit Wankhede
Sumit WankhedeSarkarnama

Wardha News : भारतीय जनता पक्षाने (BJP News) आगामी लोकसभा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे.

४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांच्या यादीमध्ये एक विशेष नाव म्हणजे वर्धा या लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'ओएसडी' अशी ओळख असणारे सुमित वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sumit Wankhede
BJP : भाजपचे मिशन लोकसभा; चंद्रपूर हिट तर संभाजीनगर फ्लॉप, काय आहेत कारणे?

देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून सुमित वानखेडे यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. सुमित वानखेडे यांच वर्धा जिल्ह्याशी वेगळं नातं आहे. ते मूळचे आर्वीकर आहेत, मात्र त्यांची सासुरवाडी वर्धेत आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वाधिक विकासनिधी त्यांनी आर्वी मतदारसंघात आणला होता, अशी चर्चा होती.

Sumit Wankhede
Akola District News : अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी ‘या’ खासदार पुत्रावर !

आता वर्धा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी सुमित वानखेडे यांच्या खांद्यावर असणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील ४ आणि अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

सध्या या लोकसभा मतदारसंघात रामदास तडस खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेत भाजपचे रामदास तडस निवडून आले आहेत. आता २०२४ ला भाजपचा उमेदवार विजयी करण्याचं आणि भाजपचं मताधिक्यामध्ये सातत्य राखण्याच्या दृष्टीने वानखेडे यांनी जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com