Republicans Parti : रिपब्लिकन युवांना नकोय असले आंबेडकर अन् कवाडे !

Republicans Politics : या नेत्यांच्या एकूणच कारकिर्दीत त्या युवकांच्या पदरी काय पडले? तर काहीच नाही.
Eknath Shinde, Jogendra Kawade, Prakas Ambedkar and Uddhav Thackeray.
Eknath Shinde, Jogendra Kawade, Prakas Ambedkar and Uddhav Thackeray. Sarkarnama

Republicans Youth News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यांची युती होईल की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लॉंग मॉर्चचे प्रणेते व पीपल्स रिपब्लिकन आघाडीचे नेते जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती करून मोकळेही झाले. ठाकरे-वंचितची युती होण्याआधी शिंदेंनी त्यांच्यावर मात केली, असाही एक समज आहे. या सर्व भानगडीत रिपब्लिकन युवांना अजिबात रस नाहीये.

रिपब्लिकन नेते गटागटांत विखुरले गेल्याचे दुःख युवांना आहे. कवाडे सर यांच्यासारख्या नेत्यांना आदर्श मानून जे युवक त्याकाळी समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय झाले होते, ते आज कुठेही नाहीत. त्यातील अनेक जण निवृत्त झाले आहेत आणि बरेसचे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. या नेत्यांच्या एकूणच कारकिर्दीत त्या युवकांच्या पदरी काय पडले? तर काहीच नाही. त्यामुळे या पिढीला आता रिपब्लिकन नेत्यांच्या राजकारणाशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. आताच्या युवकांनाही या नेत्यांच्या राजकारणाशी काही देणेघेणे दिसत नाही. खरं तर रिपब्लिकन नेत्यांच्या सतत बदलत्या भूमिकेमुळे कवाडे गटाकडे आज लोक उरलेले नाहीत.

Eknath Shinde, Jogendra Kawade, Prakas Ambedkar and Uddhav Thackeray.
Politics : तुमच्याकडे आंबेडकर तर आमच्याकडे कवाडे; हे दाखवण्याचा प्रयत्न, फायदा काय?

वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलेच डॅमेज केले होते. काँग्रेसच्या मोठ्‍या नेत्यांना वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे पराभूत व्हावे लागले. यात माजी मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत वंचितची जादू फारशी चालली नाही. याशिवाय भाजपची बी टीम म्हणून बदनामीसुद्धा पत्करावी लागली. विधानसभेनंतर वंचितमध्ये गेलेल्यांनी पक्षाला सोडचिठ्‍ठी देणे सुरू केले आहे. अनेक नेते आघाडीतून बाहेर पडले. ही पडझड रोखण्यासोबत भाजपच्या बी टीमचा ठपका पुसून काढण्यासाठी वंचित आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू करून वेगळीच खेळी खेळण्याचा प्रयत्न चालवला आहे.

शिवसेनेतूनच जन्मलेल्या आणि स्वतःची सत्ता स्थापन केलेल्या शिंदे सेनेने लगेच हालचाली सुरू केल्या. बाळासाहेब आंबेडकर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी थेट कवाडे यांनाच सोबत घेतले. लाँग मार्च योग्य ठिकाणी दाखल झाला, अशी बोलकी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. कवाडे यांचे विदर्भात फारसे अस्तित्व नाही. मात्र काही दलितांची मते ते आपल्याकडे वळवू शकतात, हे ध्यानात घेऊन शिंदे सेनेने बेरजेचे राजकारण केल्याचे वरपांगी दिसून येते. मागील विधानसभेच्या निवडणुकीत कवाडे महाविकास आघाडीसोबत होते. विदर्भातील काही जागा कवाडे यांच्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. आता त्या जागांवर वंचित आघाडी दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सेनेत जाऊन कवाडे यांनीसुद्धा आपले महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.

विधान परिषदेच्या बारा जागा सध्या रिक्त आहेत. न्यायालयाने सध्या यावर स्थगिती दिली आहे. १७ फेब्रुवारीनंतर यावर फैसला होणार आहे. शिंदे सेना-भाजपला विधान परिषदेवर एका दिग्गज नेत्याला पाठवायचे आहे. जोगेंद्र कवाडे यांच्या माध्यमातून कवाडे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in