Yuva Sena : लक्षात ठेवा, राज्यातील युवक हा धोका विसरणार नाहीत…

राज्यभरातील युवक हा धोका विसरणार नाहीत, असा आक्रोश युवा सेनेचे (Yuva Sena) विभागीय सचिव हर्षल काकडे यांनी व्यक्त केला.
Yuva Sena, Maharashtra
Yuva Sena, MaharashtraSarkarnama

नागपूर : वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरीत्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला. त्यामुळे राज्यातील युवक संतप्त आहेत. राज्य सरकारने बेरोजगार युवकांसोबत धोका केला आहे आणि राज्यभरातील युवक हा धोका विसरणार नाहीत, असा आक्रोश युवा सेनेचे (Yuva Sena) विभागीय सचिव हर्षल काकडे यांनी व्यक्त केला.

हा प्रकल्प महाराष्ट्रातून (Maharashtra) गेल्यामुळे १ लाख तरुणांना रोजगाराच्या संधीला मुकावे लागले. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत खेदाची बाब असून राज्य सरकार (State Government) याला दोषी असल्याचा आक्रोश व्यक्त करून राज्यातील सुशिक्षित युवक हा धोका विसरणार नसल्याचे मत हर्षल काकडे यांनी व्यक्त केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आदेश व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव हर्षल काकड़े यांच्या नेतृत्वात काल दुपारी १२ वाजता वाडी स्थित खडगाव मार्गावरील शिवाजी स्मारकासमोर शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते एकत्रित आले.

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला अभिवादन व माल्यार्पण करून शिवसैनिकांनी शिंदे सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली. आंदोलनानंतर मोठ्या संख्येने उपस्थित युवा व शिवसैनिकांनी निषेध फलकावर स्वाक्षऱ्या करून निषेध व्यक्त केला. या निषेध आंदोलनात युवासेना विभागीय सचिव हर्षल काकडे यांच्यासह संतोष केचे, संजय अनासाने, अखिल पोहनकर, विजय मिश्रा, सुबोध जांभुळकर, धनराज लाडगे, सचिन बोंबले, शुभम डवरे, आदर्श अभ्यंकर, किशोर ढगे, कमल तायडे, बावनकर, राजू शेळके, निहाल धानोरकर, विग्नेश तेलुटे, यश हरणे, तुषार वडस्कर, राकेश निखारे, प्रतीक वाघमारे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Yuva Sena, Maharashtra
युवा सेना आक्रमक; कार्यकर्ते म्हणाले, तिकीट द्यायचे नसेल तर स्पष्ट सांगा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरून हा प्रकल्प महाराष्ट्रातून पळवण्यात आला आहे. राज्य सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी हे कृत्य केले आहे. ५० खोक्यावाली सरकार राज्याचे कधीच भले करू शकणार नाही, आदी आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. नरेंद्र मोदींचा डोळा गुजरातच्या निवडणुकीवर आहे आणि त्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे नुकसान करून वेदांता प्रकल्प गुजरातला पळवला असल्याचेही हर्षल काकडे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com